TRENDING:

T20 World Cup : टीम इंडियाच्या फेल खेळाडूला घाबरली इंग्लंड! 6 मॅचमध्ये फक्त 80 रन... तरी सापळा रचला

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडकडून माईंड गेम खेळायला सुरूवात झाली आहे.
advertisement
1/7
भारताच्या फेल खेळाडूला घाबरली इंग्लंड! 6 मॅचमध्ये फक्त 80 रन... तरी सापळा रचला
भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांनी एक-एक सामना गमावला आहे. भारताचा सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि इंग्लंडचा वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला.
advertisement
2/7
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामने झाले आहेत, यातले 3 सामने भारताने आणि 2 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. लागोपाठ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत-इंग्लंड खेळत आहेत. 2022 च्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा आणि 2024 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.
advertisement
3/7
गुरूवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. पण या सामन्याआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनने टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मापासून आम्ही सावध राहणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
4/7
अभिषेक शर्माने वानखेडे स्टेडियमवरच इंग्लंडविरुद्ध 54 बॉलमध्ये 135 रनची वादळी खेळी केली होती, यात 13 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 रननी पराभव केला होता. इंग्लंडचा टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा पराभव होता.
advertisement
5/7
'मी अपेक्षा करतो की अभिषेक पुन्हा तशी खेळी करणार नाही. या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, आमचं पूर्ण लक्ष गुरूवारच्या सामन्यावर आहे', असं सॅम करन म्हणाला आहे.
advertisement
6/7
संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 6 इनिंगमध्ये अभिषेकने फक्त 80 रन केल्या आहेत, ज्यात झिम्बाब्वेविरुद्ध 55 रन आहेत. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये तर अभिषेक शून्य रनवर आऊट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 12 बॉल 15 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 11 बॉल 10 रन केल्या.
advertisement
7/7
अभिषेक शर्मा संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघर्ष करत आहे, तरीही इंग्लंडच्या टीमला त्याचा धोका वाटत आहे. कारण सेमी फायनलमध्ये अभिषेकला सूर गवसला तर तो एकहाती सामन्याचं चित्र बदलू शकतो, हे इंग्लंडला माहिती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाच्या फेल खेळाडूला घाबरली इंग्लंड! 6 मॅचमध्ये फक्त 80 रन... तरी सापळा रचला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल