MPSC चा अभ्यास सोडला, विलासने पुण्यात उभारला पांढऱ्या पोह्यांचा व्यवसाय, महिन्याला 7 लाखांची उलाढाल
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सुरुवातीला पारंपरिक पिवळे पोहे विकले जात होते. मात्र पुण्यासारख्या खाद्यसंस्कृती जपणाऱ्या शहरात काहीतरी वेगळं देण्याचा विचार त्यांनी केला. त्यातून पांढरे पोहे ही कल्पना साकारली.
advertisement
1/7

पुणे शहरात नेहमीच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी चाखायला मिळते. मिसळ, वडापाव, थालीपीठ यांसारख्या पारंपरिक पदार्थांसोबत आता नवनवीन प्रयोगही पुणेकरांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. अशाच एका साध्या पण वेगळ्या चवीमुळे चर्चेत आलेले ठिकाण म्हणजे सदाशिव पेठेतील पोहे जंक्शन. पांढरे पोहे ही खास ओळख निर्माण करत विलास नलभे यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला आहे.
advertisement
2/7
मुळचे बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावचे असलेले विलास 2019 साली स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत असताना त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
advertisement
3/7
दरम्यान कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. वडील ऊसतोड मजूर असल्याने घरची आर्थिक स्थिती हालाखीची होती. लॉकडाऊननंतर मित्राच्या मदतीने त्यांनी छोटेसे दुकान भाड्याने घेतले आणि खाद्यव्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
4/7
सुरुवातीला पारंपरिक पिवळे पोहे विकले जात होते. मात्र पुण्यासारख्या खाद्यसंस्कृती जपणाऱ्या शहरात काहीतरी वेगळं देण्याचा विचार त्यांनी केला. त्यातून पांढरे पोहे ही कल्पना साकारली. कमी मसाले वरून घातलेली खास चटणी आणि बारीक शेव यामुळे या पोह्यांना वेगळीच ओळख मिळाली. सकाळच्या नाश्त्यासाठी हलका, पोटभर आणि परवडणाऱ्या दरात मिळणारा पर्याय म्हणून हे पोहे लोकप्रिय झाले.
advertisement
5/7
अवघ्या 25 रुपयांत मिळणारे हे पोहे विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरले. विलास यांना त्यांच्या मैत्रीण ऐश्वर्या हिचाही मोठा पाठिंबा मिळाला. 2021 पासून दोघांनी मिळून व्यवसाय वाढवण्यावर भर दिला.
advertisement
6/7
आज पोहे जंक्शनची दोन दुकाने आणि द एग जंक्शन नावाचे स्वतंत्र आउटलेट असे एकूण तीन दुकाने सुरू आहेत. पाच जणांना रोजगार देत हा व्यवसाय महिन्याला सुमारे सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल करतो.
advertisement
7/7
एकेकाळी कर्जबाजारी असलेले विलास आज ते कर्ज फेडून स्थिर व्यवसाय करत आहेत. साध्या पोह्यांमध्ये केलेला छोटासा बदल, चिकाटी आणि मित्रपरिवाराचा आधार यामुळे पांढरे पोहे ही ब्रँड ओळख तयार झाली आहे. पुण्याच्या खाद्यनकाशावर आता पोहे जंक्शन हे नाव ठळकपणे उमटले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
MPSC चा अभ्यास सोडला, विलासने पुण्यात उभारला पांढऱ्या पोह्यांचा व्यवसाय, महिन्याला 7 लाखांची उलाढाल