Weather Alert : महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होणार, उष्णतेची येतेय लाट, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
राज्यात कमाल तापमानात हळूहळू 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होत असून, पुढील 4 दिवस ही वाढ पाहायला मिळेल. उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा धोका वाढत असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
1/7

महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान 4 मार्च रोजी कायम राहील. राज्यात कमाल तापमानात हळूहळू 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होत असून, पुढील 4 दिवस ही वाढ पाहायला मिळेल. उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा धोका वाढत असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
2/7
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअस राहील. काही ठिकाणी 37 अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23-25 अंश सेल्सिअस राहील. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट असेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागात कमाल तापमान 34-38 अंश सेल्सिअस राहील. किमान 20-24 अंश सेल्सिअस राहील. कोरडे आणि उष्ण हवामान राहील. रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. उकाडा जाणवेल, पण कोकणा इतका दमट नाही.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये कमाल 35-39 अंश राहील. किमान 20-23 अंश राहील. कोरड्या वाऱ्यांसह उष्णता वाढेल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेडमध्ये कमाल तापमान 36-40 अंश राहील. किमान 21-24 अंश राहील. उष्ण आणि कोरडे हवामान राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये कमाल 37-41 अंश राहील. किमान 22-25 अंश राहील. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
महाराष्ट्रात 4 मार्च रोजी उष्णता जाणवेल. त्यामुळे उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाणी भरपूर प्या, थेट सूर्य टाळा, दुपारी 12-4 वाजेपर्यंत बाहेर जातानी काळजी घ्या. शेतकरी, मजूर आणि पर्यटकांनी सावध राहावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होणार, उष्णतेची येतेय लाट, या जिल्ह्यांना अलर्ट