TRENDING:

Cancer Risk : शाकाहारामुळे कर्करोगाला आळा बसू शकतो ? कर्करोगासंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाचं महत्त्वाचं संशोधन

Last Updated:

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आहार आणि कर्करोग यांच्यातील संबंधांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास नुकताच सादर केला. ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासातून काही महत्त्वाची निरीक्षणं समोर आली आहेत. जे लोक मांसाहार टाळतात त्यांना अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो असा महत्त्वाचा निष्कर्ष यात मांडण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपण कसे दिसतो हे आपल्या पोटात कोणतं अन्न जातं यावर अवलंबून असतं. कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. खाण्याच्या अनेक चुकीच्या सवयींमुळे शरीराचं नुकसान होत असतं.
News18
News18
advertisement

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आहार आणि कर्करोग यांच्यातील संबंधांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास नुकताच सादर केला. ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासातून काही महत्त्वाची निरीक्षणं समोर आली आहेत. जे लोक मांसाहार टाळतात त्यांना अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो असा महत्त्वाचा निष्कर्ष यात मांडण्यात आला आहे.

Mouthwash : मौखिक स्वच्छतेसाठी नैसर्गिक पद्धत, दुर्गंधी होईल गायब, वाचा सविस्तर

advertisement

या अभ्यासासाठी, शास्त्रज्ञांनी सोळा वर्षांच्या कालावधीत भारत, युके, अमेरिका आणि तैवानमधील 18  लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचं सखोल विश्लेषण केलं. या अभ्यासात मांसाहारी तसंच शाकाहारींचाही समावेश होता. संशोधनादरम्यान, लोकांचं वजन, उंची (BMI) आणि जीवनशैली यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा देखील विचार करण्यात आला.

शाकाहारी आहार घेतल्यानं शरीराचं अनेक जीवघेण्या आजारांपासून संरक्षण होऊ शकतं असं या अभ्यासाच्या निकालांवरून दिसून आलं आहे. आकडेवारीनुसार, मांसाहारींच्या तुलनेत शाकाहारींना खालील कर्करोगांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होता:

advertisement

कर्करोगाचा धोका कमी

रक्त कर्करोगाचा धोका - 31% कमी

मूत्रपिंडाचा कर्करोगाचा धोका - 28% कमी

स्वादुपिंडाचा कर्करोगाचा धोका - 21% कमी

प्रोस्टेट कर्करोगाचा धोका - 12% कमी

स्तन कर्करोगाचा धोका - 9% कमी

शाकाहारामुळे आपल्या शरीरातील चयापचय सुधारतो आणि शरीराचं अंतर्गत कार्य सुधारतं.

आतड्याच्या कर्करोगाबद्दल धक्कादायक सत्य यातून समोर आलंय. मांसाहारामुळे कोलन कर्करोगाचा धोका वाढतो, पण या अभ्यासात शाकाहारी आणि मांसाहारी दोघांसाठीही हा धोका जवळजवळ समान असल्याचं आढळून आलं. वेगन आहार करणाऱ्यांना हा धोका थोडा जास्त असल्याचं दिसून आलं असलं तरी, याबाबतीतलं sample size लहान असल्यामुळे हे निष्कर्ष चुकीचे ठरतात असं शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.

advertisement

Digestion : जड पोट होईल हलकं, घरातल्या दोन पदार्थांमुळे पचन होईल सुलभ

शाकाहार फायदेशीर असला तरी, शाकाहारींनी त्यांच्या शरीरात पोषक घटक योग्य प्रमाणात आहेत याची काळजी घ्यावी असा महत्त्वाचा सल्ला प्रमुख संशोधक अरोरा पेरेझ कॉर्नागो यांनी दिला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आपला आहार कर्करोगासारख्या गंभीर आजारांविरुद्ध ढाल म्हणून काम करू शकतो असं या संशोधनातून सिद्ध होतं. अन्नातून आवश्यक पोषण मिळत नसेल तर पूरक आहार म्हणजेच supplement घेता येतात. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer Risk : शाकाहारामुळे कर्करोगाला आळा बसू शकतो ? कर्करोगासंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाचं महत्त्वाचं संशोधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल