TRENDING:

T20 World Cup : टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का नाही? 'बाबा वेंगा'ने 48 आधीच केली भविष्यवाणी!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. संजू सॅमसनने 50 बॉलमध्ये नाबाद 97 रनची खेळी केली, त्यामुळे करो या मरो सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला धूळ चारली. वेस्ट इंडिजने दिलेल्या 196 रनचा विक्रमी पाठलाग करताना भारताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे.
टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का नाही? 'बाबा वेंगा'ने 48 आधीच केली भविष्यवाणी!
टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का नाही? 'बाबा वेंगा'ने 48 आधीच केली भविष्यवाणी!
advertisement

वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे, त्याआधी 4 मार्चला कोलकात्यामध्ये पहिली सेमी फायनल होईल. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील.

पाकिस्तानी खेळाडूंना मात्र भारताचं सेमी फायनलमध्ये पोहोचणं पचत नाहीये. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमिरने पुन्हा एकदा टीम इंडियाबद्दल दावा केला आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव होईल, अशी भविष्यवाणी मोहम्मद आमिरने केली होती, जी पूर्णपणे खोटी ठरली.

advertisement

आता मोहम्मद आमिरने टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही, असा दावा केला आहे. मोहम्मद आमिरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत होईल, असं माझं विश्लेषण होतं, पण संजू सॅमसन चांगला खेळला. टीम इंडिया अजूनही परिपूर्ण क्रिकेट खेळलेली नाही. बुमराह वगळता त्यांचा एकही बॉलर फॉर्ममध्ये नाही', असं मोहम्मद आमिर म्हणाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आमिर एवढ्यावरच थांबला नाही, 'तुम्ही बॅटिंगकडे पाहिलंत तर ते प्रत्येक सामन्यात कोसळत आहेत. पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे, इंग्लंडची टीम चांगली आहे. मला खात्री आहे की भारत फायनलमध्ये पोहोचणार नाही', असं वक्तव्य मोहम्मद आमिरने केलं आहे. आता मोहम्मद आमिरची ही भविष्यवाणी खरी ठरते का खोटी? हे 5 मार्चला रात्री 10.30 नंतरच स्पष्ट होईल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का नाही? 'बाबा वेंगा'ने 48 आधीच केली भविष्यवाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल