Success Story : ऑफिस बॉय बनला मालक, दादासाहेबने उभारल्या 2 कंपन्या, तब्बल 6 कोटींचा टर्नओव्हर
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
इन्फोसिस कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आज दोन कंपनीचा सीईओ बनला आहे. त्याचं नाव दादासाहेब भगत. आज त्यांच्या कंपन्यांचा टर्नओव्हर तब्बल 6 कोटीहून अधिक आहे.
advertisement
1/7

आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर इन्फोसिस कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आज दोन कंपनीचा सीईओ बनला आहे. त्याचं नाव दादासाहेब भगत. आज त्यांच्या कंपन्यांचा टर्नओव्हर तब्बल 6 कोटीहून अधिक आहे.
advertisement
2/7
दादासाहेब भगत यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबात झाला. परिस्थिती बेताची असताना देखील त्यांनी सहा महिने शाळा आणि आणि सहा महिने ऊस तोडणी करून आपलं ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. नोकरीच्या शोधात त्यांनी पुण्याची वाट धरली. पुण्यात आल्यानंतर त्यांना पहिली नोकरी 4 हजार रुपयांची मिळाली.
advertisement
3/7
काही कालावधी नंतर पहिल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी इन्फोसिस कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम केलं. याठिकाणी त्यांना 9 हजार पगार दिला जात होता आणि हीच नोकरी त्याचं आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारी ठरली.
advertisement
4/7
ऑफिस बॉयची नोकरी करत असताना यांनी आपलं शिकणं सुरू ठेवलं. दिवसा नोकरी आणि वेळ मिळेल तेव्हा शिक्षण असा त्यांचा दिनक्रम होता. याकाळात त्यांनी ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशन शिकले. यामुळे त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. पुढे मुंबईत काम करत असताना त्यांनी C++ आणि Python शिकले.
advertisement
5/7
यादरम्यान दादासाहेब यांना डिझाइन आणि ग्राफिक्समध्ये नवीन संधी दिसली त्यांनी पुन्हा वापरता येणाऱ्या टेम्पलेट्सवर काम करण्याची ठरवले ही टेम्पलेट्स ऑनलाइन विकायला देखील सुरुवात केली. त्याच काळात त्यांचा बाईक अपघात झाला आणि काही महिने विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर त्यांनी Design Template ही कंपनी सुरू केली.
advertisement
6/7
कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी आपल्या गावी जायचा निर्णय घेतला .गावी गेल्यानंतर तेथील तरुणांना प्रशिक्षण देत गाईच्या गोठ्यात ऑफिस सुरू केले. या कामाची दखल मन की बात कार्यक्रमात घेतली गेली.
advertisement
7/7
यानंतर त्यांनी Bhaktavatsal Production’ही कंपनी सुरू केली. एका ऑफिस बॉयपासून सुरू झालेला प्रवास आज 6 कोटींपेक्षा जास्त उलाढालीपर्यंत पोहोचला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : ऑफिस बॉय बनला मालक, दादासाहेबने उभारल्या 2 कंपन्या, तब्बल 6 कोटींचा टर्नओव्हर