आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, जो अगदी स्वस्त आहे आणि त्याचा प्रभाव मात्र जास्त आहे. तुम्ही याचा योग्य वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या येणं टळेल. सुरकुत्या कमी होईल. हा उपाय महागडी ट्रीटमेंट 'बोटॉक्स'प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर काम करते. या उपायाबद्दल mansifaceyoga या अकाऊंटवरून माहिती दिली गेली आहे. चला पाहूया हा उपाय काय आहे.
advertisement
सुरकुत्या रोखण्यासाठी सोपा उपाय..
सुरकुत्या रोखण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर बऱ्याच काळापासून महिला वृद्धत्वविरोधी उपाय म्हणून करतात. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील, त्वचा निस्तेज दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घरगुती उपाय केल्यास अकाली दिसणारे वृद्धत्वाचे परिणाम कमी होऊ शकतात. चला पाहूया चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा.
असा करा व्हिटॅमिन ई कॅप्सूलहा वापर..
- सर्वात आधी तुमचे हात आणि चेहरा स्वच्छ धुवा.
- आता तुमच्या तळहातावर कोणतेही फेस ऑइल घ्या.
- यामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाका आणि ते हातावर व्यवस्थित मिक्स करा.
- आता दोन्ही हातांवर हे मिश्रण घेऊन तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा.
- लावल्यानंतर 10 मिनिटे हे चेहऱ्यावर राहू या.
- 10 मिनिटानंतर साध्या पाण्याने आणि सौम्य क्लींजरने चेहरा धुवा.
मानसी यांच्या मते, आठवड्यातून दोनदा ते चेहऱ्यावर लावल्याने काही काळानंतर तुम्हाला बदल दिसून येतील. अर्थात यासोबत तुमची जीवनशैली देखील संतुलित असायला हवी. म्हणजे पुरेशी झोप, योग्य आहार, तेलकट पदार्थ टाळणं आणि ताण कमी घेणं.. यांचाही त्वचेवर चांगला परिणाम दिसतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
