TRENDING:

VIDEO: 25 लाखांचा विडा अन् 10 लाखांचा लिंबू, मोशी उत्सवात दीड कोटींची बोली, अशीही 150 वर्षांची परंपरा!

Last Updated:

Moshi Festival 2026: उत्सवात वापरल्या जाणाऱ्या लिंबू, अद्यावाची ओटी आणि इतर वस्तूंचाही लिलाव केला जातो. ही परंपरा या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे नुकताच नागेश्वर महाराजांचा उत्सव पार पडला. या उत्सवातील मानाच्या पानाच्या विड्याचा लिलाव झाला. या लिलावाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. एक लाख रुपयांपासून सुरू झालेली बोली अखेरीस 25 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. अखेर ही बोली भाविक विजय पांडुरंग सस्ते यांनी जिंकली. उत्सवात वापरल्या जाणाऱ्या लिंबू, आद्य ओटी आणि इतर वस्तूंचाही लिलाव केला जातो. ही परंपरा या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. नितीन पांडुरंग सस्ते यांनी 25 लाखांच्या लिलावाबाबत लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

नितीन सस्ते यांनी सांगितलं की, परंपरागत असणारा लिलाव नुकताच नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला. ही सुमारे 150 वर्षांची परंपरा आहे. 150 वर्षांपूर्वी नागेश्वर महाराज मोशी गावात कुंभमेळ्याच्या प्रवासातून आले होते. 8 दिवस गावात राहिल्यानंतर त्यांनी पुढे प्रस्थान केले. मात्र, त्यांच्या आगमनामुळे गावाची भरभराट झाली आणि महाराजांबद्दल मोठी श्रद्धा निर्माण झाली.

advertisement

Handloom Saree: लाखाच्या अन् हजाराच्या साडीत नेमका फरक काय? Video पाहा, तुम्हालाच कळेल खरं कारण

यंदा दीड कोटींचा निधी

यंदा लिलावातून महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा एकूण निधी दीड कोटी रुपयांहून अधिक झाला. मानाची ओटी आकाश विष्णू सस्ते यांनी 17,11,101 रुपयांना घेतली. शेवटचे लिंबू स्वप्नील दत्तात्रेय सासवडे यांनी 10,11,101 रुपयांना विकत घेतले, पहिले लिंबू संभाजी बबन बोन्हाडे यांनी 2,11,000 रुपयांना खरेदी केले. मानाचा पहिला विडा दोन लाख रुपयांना विकला गेला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
VIDEO: 25 लाखांचा विडा अन् 10 लाखांचा लिंबू, मोशी उत्सवात दीड कोटींची बोली, अशी
सर्व पहा

भाविकांची अशी श्रद्धा आहे की, नागेश्वर महाराजांच्या उत्सवात अर्पण केलेली वस्तू घेतल्यावर घरात सुख-शांती लाभते, अडचणी दूर होतात आणि कामे मार्गी लागतात. म्हणूनच उत्सवात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा लिलाव पारंपरिक पद्धतीने केला जातो. प्रत्येक भाविक आपली श्रद्धा व्यक्त करून या परंपरेत भाग घेतो, अशी माहिती नितीन सस्ते यांनी दिली.

मराठी बातम्या/पुणे/
VIDEO: 25 लाखांचा विडा अन् 10 लाखांचा लिंबू, मोशी उत्सवात दीड कोटींची बोली, अशीही 150 वर्षांची परंपरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल