TRENDING:

Kitchen Tips : दूध तापवण्यासाठी कोणत्या धातूचं भांडं वापरणं योग्य आहे? 'ही' भांडी वापरणं तात्काळ सोडा

Last Updated:
Which metal utensil is good to boil milk : घरात दूध जवळपास रोज आणलं जातं आणि ते रोज तापवंलंही जातं. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. त्यामध्ये आपण दूध तापवतो. पण दूध तापवण्यासाठी नेमकं कोणत्या धातूचं भांडं सुरक्षित आहे? चला जाणून घेऊया.
advertisement
1/7
दूध तापवण्यासाठी कोणत्या धातूचं भांडं योग्य आहे? 'ही' भांडी वापरणं तात्काळ सोडा
आयुर्वेदानुसार, दूध तापवण्यासाठी कोणत्या धातूचे भांडे चांगले असतात, ज्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो. याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याच बरोबर कोणत्या धातूचे भांडे वापरणं योग्य नसतं.
advertisement
2/7
सर्वात आधी बोलूया कांस्यच्या भांड्यांबद्दल. या भांड्यामध्ये उकळलेले पचनासाठी चांगले असते. या धातूमध्ये दूध तापवून प्यायल्याने वात आणि पित्त संतुलित राहण्यास मदत करते. असेही मानतात की, कांस्यच्या भांड्यात दूध उकळल्यास दुधातील बॅक्टेरिया कमी होतात.
advertisement
3/7
सर्वात सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहे. तो म्हणजे स्टेनलेस स्टील. हल्ली बहुतांश घरांमध्ये स्टेनलेस स्टीलची भांडी वापरली जातात. आयुर्वेदानुसार, या जड भांड्यामधे कोणतेही विशेष गुणधर्म नाही. मात्र त्याचे काही दुष्परिणामही नाही. ही भांडी दूध तापवण्यासाठी एक सुरक्षित आणि सोपा पर्याय मानली जातात..
advertisement
4/7
लोक पितळेच्या भांड्याचा वापर स्वयंपाकासाठ मोठ्या प्रमाणावर करतात, यातील पाणीदेखील आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्याचप्रमाणे पितळेच्या भांडयात दूध तापवल्याने त्यातील दूध पोषक तत्व टिकून राहतात. पितळेच्या भांड्यातील दूध तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, यकृत आणि पचन समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते.
advertisement
5/7
मातीच्या भांड्यांची आवड खूप लोकांना असते. यात शिजवलेल्या अन्नाची चवंही खूप उत्तम असते. आयुर्वेदानुसार, कमी आचेवर मातीच्या भांड्यात दूध उकळल्याने त्याचे पौष्टिक मूल्य टिकते, पोटातील वायू आणि अपचन कमी होण्यास मदत होते. तसेच मोत्याच्या भांड्यातील दुधाची चवही अप्रतिम असते.
advertisement
6/7
काही धातू आहेत ज्यामध्ये दूध तापवणे आपण टाळले पाहिजे. सर्वात आधी आहे ते म्हणजे, अ‍ॅल्युमिनियम. आयुर्वेदानुसार यामध्ये दूध उकळल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते आणि दीर्घकालीन मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर नॉन-स्टिकची भांडीही वापरू नये कारण जास्त उष्णतेमध्ये यातून रसायने बाहेर पडण्याचा धोका असतो.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : दूध तापवण्यासाठी कोणत्या धातूचं भांडं वापरणं योग्य आहे? 'ही' भांडी वापरणं तात्काळ सोडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल