मार्चमध्ये सूर्याचा ट्रिपल धमाका! 4 राशींना लागणार जॅकपॉट, सुरू होणार गोल्डन टाइम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. मात्र, राशी परिवर्तनासोबतच सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देखील मानवी जीवनावर खोलवर परिणाम करते.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. मात्र, राशी परिवर्तनासोबतच सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देखील मानवी जीवनावर खोलवर परिणाम करते. मार्च 2026 हा महिना या दृष्टीने अत्यंत विशेष आहे, कारण या एकाच महिन्यात सूर्य तीन वेळा नक्षत्र बदलणार आहे.
advertisement
2/6
सूर्याच पहिल नक्षत्र परिवर्तन 5 मार्च रोजी म्हणजेच आज होईल. या दिवशी सूर्य देव पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. त्यानंतर 18 मार्च रोजी ते उत्तर भाद्रपद नक्षत्रात जातील. त्यानंतर 31 मार्च 2026 रोजी ते रेवती नक्षत्रात प्रवेश करतील. जाणून घ्या सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल.
advertisement
3/6
मेष - आत्मविश्वास आणि प्रगती: सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास शिखरावर असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. सरकारी कामात असलेले अडथळे दूर होतील आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
advertisement
4/6
मिथुन - करिअरमध्ये मोठी झेप: मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा असेल. नोकरीत बढती किंवा पगारवाढीचे योग आहेत. जे लोक व्यवसायात आहेत, त्यांना नवीन संधी मिळतील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुमचे नेटवर्किंग तुम्हाला मोठा आर्थिक फायदा करून देईल.
advertisement
5/6
सिंह - राजेशाही थाट: सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य असल्याने हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. तुमच्या नेतृत्वगुणांचे कौतुक होईल. अडकलेली जुनी कामे वेगाने पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता असून, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.
advertisement
6/6
धनु - आर्थिक भरभराट: धनु राशीच्या लोकांसाठी 'गोल्डन टाइम' सुरू झाला आहे. गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल. घरामध्ये मंगल कार्ये ठरतील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मार्चमध्ये सूर्याचा ट्रिपल धमाका! 4 राशींना लागणार जॅकपॉट, सुरू होणार गोल्डन टाइम