TRENDING:

Surya Grahan 2026: अमावस्येला दुसरं पूर्ण सूर्यग्रहण लागणार; दिवसा अंधारून येईल, कोणत्या देशात दिसणार?

Last Updated:
Surya Grahan 2026: या वर्षी दोन सूर्यग्रहण लागणार आहेत, त्यापैकी पहिलं 17 फेब्रुवारी 2026 ला होऊन गेलंय आणि आता दुसरं सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 ला लागणार आहे. हे बरंच काळ चालणारं सूर्यग्रहण असेल, जे कर्क रास आणि अश्लेषा नक्षत्रात लागेल.
advertisement
1/5
अमावस्येला दुसरं पूर्ण सूर्यग्रहण; दिवसा अंधारून येईल, कोणत्या देशात कसे दिसणार
ग्रहणाच्या वेळी सूर्य पूर्णपणे झाकला जाईल, ज्यामुळे पृथ्वीच्या काही भागांत दिवसा अंधार दाटून येईल. खगोल शास्त्राच्या दृष्टीने ही घटना फारच रोमांचक आणि महत्त्वाची मानली जात आहे. वर्षाचं हे दुसरं सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार आणि त्याची वेळ काय असेल, ते जाणून घेऊया.
advertisement
2/5
सूर्यग्रहण 2026 (Surya Grahan 2026) - वर्षाचं दुसरं सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 च्या रात्री 9 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि 13 ऑगस्ट 2026 च्या पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, पण काही ठिकाणी ते खग्रास (पूर्ण) सूर्यग्रहण म्हणून सुद्धा दिसेल.
advertisement
3/5
सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार?आर्कटिक, ग्रीनलंड, आइसलंड, अटलांटिक महासागर आणि उत्तर स्पेनमध्ये पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळेल. तर फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि युरोपच्या बहुतेक देशांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.
advertisement
4/5
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही, कारण त्या वेळी इथे रात्र असेल. धार्मिक नियमांनुसार, सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो, पण 12 ऑगस्टच्या या ग्रहणाचं सूतक पाळण्याची गरज नाही. कारण हे ग्रहण भारतातून दिसणार नाहीये. शास्त्रानुसार, जे ग्रहण आपल्या भागात दिसत नाही, त्याचं सूतक मानलं जात नाही.
advertisement
5/5
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का?सूर्यग्रहण कधीच उघड्या डोळ्यांनी पाहू नये, कारण त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. सूर्यग्रहण पाहण्यासाठी नेहमी प्रमाणित सोलर फिल्टर असलेले चष्मे किंवा दुर्बिणीचाच वापर करावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: अमावस्येला दुसरं पूर्ण सूर्यग्रहण लागणार; दिवसा अंधारून येईल, कोणत्या देशात दिसणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल