TRENDING:

Pune News: पुणेकरांची 'हाऊस'फुल्ल खरेदी! रिअल इस्टेटमध्ये पुणे पुन्हा देशात 'नंबर वन', शहरातील घरांना का मिळतीये पसंती?

Last Updated:

नव्या प्रकल्पांच्या उपलब्धतेपेक्षा घरांच्या मागणीचा वेग अधिक असल्याने पुणे रिअल इस्टेट क्षेत्रात ऐतिहासिक तेजी दिसून येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : नव्या प्रकल्पांच्या उपलब्धतेपेक्षा घरांच्या मागणीचा वेग अधिक असल्याने पुणे रिअल इस्टेट क्षेत्रात ऐतिहासिक तेजी दिसून येत आहे. २०२५ या वर्षात पुणे शहरात ८१ हजार ८१ घरांची विक्री झाली आहे. या विक्रमी कामगिरीसह पुण्याने देशातील सर्व प्रमुख महानगरांना मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
पुण्यातील घरांना मिळतीये पसंती (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यातील घरांना मिळतीये पसंती (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला

शहरातील वाढती लोकसंख्या, आयटी (IT) आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगाराच्या अमाप संधी, तसेच इतर महानगरांच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतींमुळे पुणे घरांच्या खरेदीसाठी पसंतीचे शहर ठरत आहे. सध्या पुण्यातील घरांची मागणी ही नव्या पुरवठ्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांच्या मते, आता खरेदीदार केवळ परवडणाऱ्या घरांपुरते मर्यादित न राहता, प्रशस्त आणि सोयीसुविधांनी सज्ज घरांकडे वळत आहेत.

advertisement

आकडेवारीतून स्पष्ट होणारी तेजी

पुणेकरांची आर्थिक क्षमता आणि घर खरेदीची आवड वाढल्याचे स्पष्ट संकेत आकडेवारीतून मिळतात. २०२१ मध्ये शहरातील घर खरेदी व्यवहारांचे एकूण मूल्य ३६,८५२ कोटी रुपये होते, जे २०२५ मध्ये तब्बल ६३,०६९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजे गेल्या चार वर्षांत व्यवहारांच्या मूल्यात सुमारे ७१ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे.

advertisement

पुणे का ठरतेय 'फेवरेट'?

सरासरी किंमत: इतर महानगरांच्या तुलनेत पुण्यातील घरांच्या किमती (सरासरी ७८ लाख रुपये) आजही परवडणाऱ्या आहेत.

पायाभूत सुविधा: आयटी पार्क्स आणि औद्योगिक विकासासह मेट्रो, विमानतळ विस्तार यांसारख्या पायाभूत सुविधांचा ओघ.

स्थलांतर: रोजगाराच्या शोधात शहरात येणाऱ्या स्थलांतरित लोकसंख्येचा वाढता ओघ.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

थोडक्यात, पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठ आता एका नव्या टप्प्यावर पोहोचली असून, गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी हे शहर 'हॉटस्पॉट' बनले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांची 'हाऊस'फुल्ल खरेदी! रिअल इस्टेटमध्ये पुणे पुन्हा देशात 'नंबर वन', शहरातील घरांना का मिळतीये पसंती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल