TRENDING:

IND vs ENG : शेवटच्या 15 मिनिटांचा ड्रामा! इंग्लंडने सगळी मॅच फिरवली, पण 18 वी ओव्हर ठरली गेमचेंजर, काय घडलं?

Last Updated:

IND vs ENG Match Turning Point : 17 व्या ओव्हरपर्यंत 209 धावा इंग्लंडच्या झाल्या होत्या. विजयासाठी त्यांना 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज होती. मुंबईच्या बॅटिंग पीचवर इंग्लंडसाठी हे काम सोपं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs England : आयसीसी टी-ट्वेंटीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 7 रन्सने पराभव केला अन् फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने टीम इंडियाला घाम फोडला होता. इंग्लंडने यशस्वी रनचेस करेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण शेवटच्या 15 मिनिटात टीम इंडियाने गेम पलटला. टीम इंडियासाठी 18 वी ओव्हर गेमचेंजर ठरली. अंगावर काटा आणणाऱ्या मॅचमध्ये काय काय ट्विस्ट आले. पाहा...
IND vs ENG Drama in last 15 minutes
IND vs ENG Drama in last 15 minutes
advertisement

18 बॉलमध्ये 45 धावांची गरज

17 व्या ओव्हरपर्यंत 209 धावा इंग्लंडच्या झाल्या होत्या. विजयासाठी त्यांना 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज होती. मुंबईच्या बॅटिंग पीचवर इंग्लंडसाठी हे काम सोपं होतं. त्यात इंग्लंडचा 22 वर्षाचा जेकॉब बेथल मैदानात पाय रोवून थांबला होता. तर कॅप्टन सूर्यासमोर मोठं आव्हान होतं, ओव्हर कुणाला द्यायची. सूर्याने मोठा निर्णय घेतला अन् आपला हुकमी एक्का बाहेर काढला. तो म्हणजे जसप्रीत बुमराह... बुमराहने पहिल्या तीन ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग केली होती. जिथं सर्वजण 15 ते 20 रन्स ओव्हरला देत होते. तिथं बुमराह फक्त 8 च्या इकोनॉमीने बॉलिंग करत होता. सूर्याने इथंच डाव खेळला.

advertisement

बुमराहने यॉर्करवर यॉकर टाकले

सूर्याने 18 वी ओव्हर बुमराहला सोपवलं. टीम इंडियाचा हा डाव भारी पडणार का? असा सवाल विचारला जात होता. पण सूर्याला आपल्या रणनितीवर पूर्ण विश्वास होता. सूर्याने फिल्डिंग सेट केली अन् बुमराहने देखील प्लॅन आखला. विकेट घ्यायला जायचं नाही. बुमराहने फक्त यॉर्करवर यॉकर टाकले अन् 18 व्या ओव्हरला फक्त 6 रन्स दिल्या आणि इथंच मॅच फिरली. आता इंग्लंडला दोन ओव्हरमध्ये 39 धावांची गरज होती अन् टीम इंडियाचं काम सोपं झालं.

advertisement

हार्दिक पांड्याने कमाल केली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

दरम्यान, 19 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने देखील कमाल केली. पांड्याने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सॅम करनची विकेट घेतली अन् ओव्हरला फक्त 9 रन्स दिल्या. पांड्याने या ओव्हरमध्ये इंग्लंडवर प्रेशर तयार केलं. ज्याचा फायदा टीम इंडियाला झाला. त्यानंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर टीम इंडियाचा विजय निश्चित झाला होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : शेवटच्या 15 मिनिटांचा ड्रामा! इंग्लंडने सगळी मॅच फिरवली, पण 18 वी ओव्हर ठरली गेमचेंजर, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल