TRENDING:

Buldana: 'दृश्यम' सिनेमाला लाजवेल अशी घटना, मोठा गेला अन् लहान्याला वाचवण्यासाठी आई, बाप सगळे खोटं बोलले; पण...

Last Updated:

बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक इथंही ही घटना घडली आहे. क्षुल्लक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

बुलढाणा: मोठा भाऊ हा नेहमी घरातला कर्तबगार माणूस असतो, त्यामुळे  तो सगळ्यांची काळजी घेत असतो. मोठा भाऊनेहमी आपल्या लहान भावाची लाडाने काळजी घेत असतो, पण बुलडाण्यामध्ये एका लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आपण भावाचा खून केलाच नाही, असं दाखवण्यासाठी दृश्यम सिनेमासारखा प्लॅनही या लहान्याने रचला होता. अखेरीस पोलिसांनी त्याला अटक केलं आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक इथंही ही घटना घडली आहे. क्षुल्लक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून केला.  देविदास महादेव गायकी (वय २८) असं मृत भावाचं नाव आहे. तर मंगेश महादेव गायकी (वय २५) असं खून करणाऱ्या भावाचं नाव आहे.

काय घडलं नेमकं?

5 मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मोठा भाऊ देविदास गायकी हा आपल्या मित्रासोबत दारू पिऊ घरी आला होता. दुपारच्या वेळी भाऊ दारू पिऊन मित्राला घेऊन आल्यामुळे लहान भाऊ मंगेश गायकीने त्याला हटकलं. त्याच्या मित्राला घरी जा असं सांगितलं. या छोट्याशा कारणावरून देविदास आणि मंगेशमध्ये जोरदार भांडण झालं. भांडणामध्ये देविदासने मंगेशच्या डोक्यामध्ये हातातलं कडं मारलं. त्यामुळे मंगेश आणखी चवताळला, त्याने घरात जाऊन भाजी चिरण्याचा चाकू आणला आणि देविदासवर सपसप वार केले. देविदासच्या पोटातच चाकू खुपसला. त्यामुळे चाकूचा वार वर्मी लागल्यामुळे देविदास गायकी जागेवरच कोसळला.

advertisement

आईने पोलिसांपासून वाचवण्याचाा केला प्रयत्न

घरात मोठ्या भावाचा खून झाल्यामुळे कुटुंबामध्ये एकच आक्रोश सुरू झाला. मंगेश आणि देविदासची आई घरी पोहोचली. देविदासचा मृतदेह पाहून तिने एकच हांबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देविदासचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांच्या चौकशीत आईने "कुण्या अज्ञात माणसाने देविदासवर चाकू हल्ला करून पळून गेला" अशी पोलिसांची दिशाभूल करणारी माहिती दिली.

advertisement

द्दश्यम सिनेमासारखा बनवा

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा घरातील माणसांची दृश्यम सिनेमातल्या सीन प्रमाणे एकच उत्तर देण्याचा घटनाक्रम रचलाा. अज्ञात व्यक्तीने देविदासचा खून केला, असं सांगत होते. पण, पोलिसांनी लहान भाऊ मंगेश आणि वडिलांच्या जबाबवर संशय आलाा. दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा मंगेश पोपटासारखा बोलायला लागला. मंगेशने आपणच खून केल्याची कबुली दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तांब्यालाही चमकावलं,सगळंच संपत चाललं, तांबट आळीतल्या स्नेहलताईंची कहाणी
सर्व पहा

देविदास गायकीच्या खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगेश गायकीला ताब्यात घेतलं, त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldana: 'दृश्यम' सिनेमाला लाजवेल अशी घटना, मोठा गेला अन् लहान्याला वाचवण्यासाठी आई, बाप सगळे खोटं बोलले; पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल