TRENDING:

11 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडला, आता थलापथि विजयच्या संसारात घेतली एन्ट्री! Trisha Krishnan ची शॉकिंग डेटिंग लाइफ

Last Updated:
Trisha Krishnan's shocking dating life: लग्नाच्या २७ वर्षांनंतर विजयची पत्नी संगीताने घटस्फोटाची मागणी केली आहे. अशातच विजय आणि तृषाने एका लग्नसोहळ्याला एकत्र हजेरी लावली.
advertisement
1/12
11 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडला, आता थलापथि विजयच्या संसारात घेतली एन्ट्री!
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा थलापती विजय सध्या चंदेरी पडद्यावरील त्याच्या कामापेक्षा खासगी आयुष्यातील वादळामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नाच्या २७ वर्षांनंतर विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने चक्क कोर्टाची पायरी चढत घटस्फोटाची मागणी केली आहे.
advertisement
2/12
विशेष म्हणजे, या वादाच्या केंद्रस्थानी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव घेतले जात असून, नुकत्याच एका हाय-प्रोफाईल लग्नाच्या रिसेप्शनला विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांनी एकाच रंगाचे कपडे घालून हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पडद्यानंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आहे का? असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.
advertisement
3/12
थलापती विजयच्या संसारात ज्या अभिनेत्रीची चर्चा होत आहे, ती त्रिशा कृष्णन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक दिग्गज नाव आहे. त्रिशाचा जन्म ४ मे १९८३ रोजी चेन्नईमध्ये झाला. तिने बीबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
advertisement
4/12
तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून झाली. १९९९ मध्ये तिने 'मिस मद्रास' हा किताब पटकावला होता. फाल्गुनी पाठकच्या गाजलेल्या 'मेरी चुनर उड उड जाए' या गाण्यात ती झळकली होती.
advertisement
5/12
२००२ मध्ये 'मौनम पेसियाधे'मधून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अक्षय कुमारसोबत 'खट्टा मीठा' करून तिने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले.
advertisement
6/12
त्रिशाचे वय ४२ वर्षे असले तरी तिने अद्याप लग्न केलेले नाही. २०१५ मध्ये तिचा उद्योजक वरुण मनियन याच्याशी साखरपुडा झाला होता, पण काही महिन्यांतच तो मोडला.
advertisement
7/12
याशिवाय तिचे नाव अभिनेता राणा दग्गुबातीसोबतही जोडले गेले होते. राणाने स्वतः 'कॉफी विथ करण'मध्ये कबूल केले होते की ते दोघे काही काळ रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले.
advertisement
8/12
विजय आणि त्रिशा यांनी 'गिल्ली', 'तिरुपाची', 'आथी' आणि 'कुरुवी' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. मात्र, २००८ नंतर तब्बल १५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले नाही.
advertisement
9/12
चर्चा अशी होती की, विजयच्या पत्नीने त्याला त्रिशासोबत काम करण्यास मनाई केली होती. २०२३ मध्ये 'लिओ' चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र आली आणि तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी वेग घेतला.
advertisement
10/12
विजयची पत्नी संगीताने चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. तिचा आरोप आहे की, विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत.
advertisement
11/12
विजयने हे अफेअर संपवण्याचे आश्वासन दिले होते, पण आजही ते दोघे उघडपणे एकत्र फिरत असल्याने संगीताने घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
12/12
त्यातच ५ मार्च रोजी चेन्नईतील एका रिसेप्शनमध्ये या दोघांनी मॅचिंग कपड्यांमध्ये दिलेली एन्ट्री संगीताच्या आरोपांवर शिक्कामोर्तब करणारी ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
11 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडला, आता थलापथि विजयच्या संसारात घेतली एन्ट्री! Trisha Krishnan ची शॉकिंग डेटिंग लाइफ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल