TRENDING:

Maharashtra Budget: भाजपचे मंत्री मालामाल, अजितदादांच्या मंत्र्यांना साडेसात हजार कोटी कमी, शिंदेंच्या मंत्र्यांना किती निधी?

Last Updated:

Maharashtra Budget: शुक्रवारी दोन वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवारांच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Budget: शुक्रवारी दोन वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्प मांडावा लागला आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता अजित पवार गटाच्या मंत्र्यांचा निधी काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निधीला देखील कात्री लावण्यात आली आहे. भाजपचे मंत्री मात्र मालामाल झाले आहेत.
Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026
advertisement

भाजपच्या १७ मंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांसाठी तब्बल १ लाख ६ हजार २८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचं भाजपकडून सांगितलं जात असलं तरी, मित्रपक्षांच्या तुलनेत ही रक्कम खूपच मोठी आहे.

शिंदे गट आणि राष्ट्रवादीला फटका?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (शिंदे गट) ९ मंत्र्यांच्या खात्यांसाठी ४३,२८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या तुलनेत ही तरतूद ६२,९९४ कोटी रुपयांनी कमी आहे. एवढेच नाही तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत शिंदे गटाच्या बजेटला २ हजार ८६८ कोटींची कात्री लावण्यात आली आहे.

advertisement

दुसरीकडे, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटात चिंतेचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांचे बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १८.८२ टक्क्यांनी कमी झालं आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या खात्यांकडे ४७,७१२ कोटींची तरतूद होती, ती आता ७,५५८ कोटींनी घटून ४०,१५४ कोटींवर आली आहे. अजित पवार अर्थमंत्री असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना - नेत्यांना झुकतं माप मिळतं, असं बोललं जात होतं. मात्र दादांशिवाय सादर झालेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांच्या मंत्र्यांना काही प्रमाणात फटका बसला आहे.

advertisement

सुनेत्रा पवारांकडील खात्यांना निधी किती

अर्थसंकल्पात अजित पवार गटाच्या मंत्र्यांचा निधी कमी केला असला तरी अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या खात्यांचा निधी काही प्रमाणात वाढवण्यात आला आहे. सुनेत्रा पवारांकडे असलेल्या उत्पादन शुल्क विभागाला १५९ कोटी १२ लाख रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी हाच निधी १५३ कोटी इतका होता. यंदा या निधीत ६ कोटी १२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

advertisement

पक्ष मंत्री संख्या एकूण तरतूद (कोटीत) फरक/घट
भाजप 17 १,०६,२८० कोटी सर्वाधिक तरतूद
शिंदे सेना 9 ४३,२८६ कोटी २,८६८ कोटींची घट
राष्ट्रवादी 8 ४०,१५४ कोटी
७,५५८ कोटींची घट (१८.८२%)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तसेच त्यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खात्याला ५५८ कोटी मिळाले. गेल्या वर्षी ५३७ कोटींचा निधी मिळाला होता. अल्पसंख्याक वर्ग ही राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) मोठी व्होट बँक असल्याने या विभागाला ८४४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ८१२ कोटींचा निधी होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Budget: भाजपचे मंत्री मालामाल, अजितदादांच्या मंत्र्यांना साडेसात हजार कोटी कमी, शिंदेंच्या मंत्र्यांना किती निधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल