APMC Market: द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या मार्केटमध्ये कृषी दरात तफावत पहायला मिळते. शुक्रवार, दिनांक 6 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
सांगली: महाराष्ट्रातील विविध कृषी मार्केटमध्ये शेती मालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. या मार्केटमध्ये कृषी दरात तफावत पहायला मिळते. शुक्रवार, दिनांक 6 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहू.
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 69 हजार 653 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 21 हजार 190 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 292 ते 1142 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 408 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1550 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 882 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 394 क्विंटल लिंबूला 2000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लिंबूला 9000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1063 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 748 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 14000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 471 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात 290 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 900 ते 2000 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला. तसेच पुणे बाजारात आवक झालेल्या 128 क्विंटल केळीला 20500 सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमालांच्या निर्यातीवर परिणाम होत असला तरी त्याचे थेट परिणाम अजूनतरी राज्याच्या बाजारावर झाल्याचे दिसत नाहीत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 10:17 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा









