advertisement

Sion Flyover च्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडला, किती दिवसांत पूर्ण होणार ब्रिजचं संपूर्ण काम?

Last Updated:

सायन उड्डाणपुलाबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सायन उड्डाणपुल केव्हापासून सुरू होणार आहे? याची माहिती समोर आलीये

News18
News18
मुंबई: मुंबई शहरामध्ये अनेक महत्त्वाच्या पुलाचे काम सुरु असून नागरिकांचे त्या पुलामुळे प्रवाशासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात आहे. आता अशातच सायन उड्डाणपुलाबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या उड्डाणपुलाचे 15 जुलै 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहे. शिवाय, या ब्रिजच्या उद्घाटनाचाही मुहूर्त सापडला आहे. पण त्यासाठी प्रवाशांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
सायन ब्रिज उद्घाटनाला मुहूर्त सापडला
सायन उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून पूल बांधणीच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे. पालिकेच्या स्थायी समितीत प्रकल्पाच्या 7 कोटी रुपये वाढीव खर्चाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. पुलाचे 42 कोटी 63 लाख 890 रुपयांचा वाढीव खर्च आता 49 कोटी 96 लाख 433 रुपयांवर गेला आहे. धारक भिंत बदलून पायील कॅप आणि टच पायील प्रकल्प पद्धतीत बदल केला जाणार असून स्टील गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे प्रकल्प खर्चात वाढ केला जाणार आहे. दरम्यान पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
advertisement
सायन उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील काम सुरु
सायन उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील कामात मुख्य रेल्वे मार्ग, जाण्याचे रस्ते आणि दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्ण झाल्यामुळे पश्चिमेकडील पादचारी वाहतूक व्यवस्थापन केले जाईल. अभिजीत बांगर यांनी अभियंत्यांना दररोज कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आणि कामाचे नीट निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.
advertisement
पश्चिमेकडील काम चार टप्प्यांमध्ये सुरू
पश्चिमेकडील काम चार टप्प्यांमध्ये चालू असून 31 मेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेकडील ताबा मिळाल्यानंतर पूर्व बाजूचे जाण्याचे रस्ते पालिकेच्या ताब्यात येईल. जुन्या पुलाचा उत्तरेकडील भाग पाडला गेला असून दक्षिणेकडील भाग काढण्याचे काम सुरू आहे. शेवटचा गर्डर 31 मेपर्यंत बसविला जाईल. पूर्व बाजूची राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी अंदाजे 30 ते 45 दिवस लागणार आहेत.
advertisement
या प्रकल्पानंतर सायन उड्डाणपुल पूर्णत: सुरक्षित आणि चालू होईल तसेच पादचारी आणि वाहनांनाही अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध होतील. मुंबईकरांसाठी ही एक मोठी सुधारणा ठरणार असून वाहतुकीची गती आणि सुरक्षितता दोन्ही वाढेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Sion Flyover च्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडला, किती दिवसांत पूर्ण होणार ब्रिजचं संपूर्ण काम?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement