Nanded: लेकीला डॉक्टर बनायचं होतं, आता संगळं संपलं, पोलिसांसमोर बाप ढसाढसा रडला, नांदेडमधील हृदयद्रावक घटना
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Sachin S
Last Updated:
या घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सिडको येथील ज्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती
नांदेड: नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे, मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे. याा घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या सिडको भागातील एका खाजगी हॉस्टेलमध्ये 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षा गायकवाड (वय २५) असं मयत तरुणीचं नाव आहे. हडको येथील महाविद्यालयात बी. एच . एम. एस द्वितीय वर्षात ती शिकत होती. सिडको येथील राजकीय पक्षाचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती.
advertisement
शुक्रवारी दुपारी दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला आकांक्षा बाहेर न आल्यामुळे सोबत राहणाऱ्या मुलींना संशय आला. रुम उघडून पाहिले असता आकांक्षाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मुलीची आत्महत्या नसून घातपात
दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गायकवाड कुटुंबीयांनी हॉस्टेलकडे धाव घेतली. आकांक्षाने आत्महत्या केली नसून घातपात झाल्याचा आरोप मयत आकांक्षा हीचे वडील मुजांजी गायकवाड यांनी केला. तिचा मासनिक आणि शारीरिक छळ झाला असावा, असा संशय मयत तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
हॉस्टेलची होणार चौकशी
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सिडको येथील ज्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती , त्याठिकाणी 40 ते 50 मुली राहतात अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, खाजगी हॉस्टेलला कोणतीही परवानगी नसून नियमाचं पालन होतं नाही. सुरक्षेच्या उपायोजना देखील नसल्याचं सांगण्यात आलं आहे. याची देखील पडताळणी केली जाईल, नातेवाइकांनी जे आरोप केले आहे, त्याबाबतचा तपास करुन गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी सांगितलं.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 10:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: लेकीला डॉक्टर बनायचं होतं, आता संगळं संपलं, पोलिसांसमोर बाप ढसाढसा रडला, नांदेडमधील हृदयद्रावक घटना









