TRENDING:

16 व्या वर्षी डेब्यू, पहिलीच फिल्म ठरली ब्लॉकबस्टर; एका आजाराने उद्ध्वस्त केलं आयुष्य, आता कुठे आहे अभिनेत्री?

Last Updated:
Guess Who: अवघ्या १६ व्या वर्षी गोविंदा आणि चंकी पांडे सारख्या सुपरस्टार्ससोबत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
advertisement
1/8
16 व्या वर्षी डेब्यू, पहिलीच फिल्म ठरली ब्लॉकबस्टर; एका आजाराने झाली उद्ध्वस्त
९० च्या दशकातील ती चुलबुली मुलगी तुम्हाला आठवतेय का? जिने अवघ्या १६ व्या वर्षी गोविंदा आणि चंकी पांडे सारख्या सुपरस्टार्ससोबत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. तिची जादू फक्त अभिनयापुरती मर्यादित नव्हती, तर आपल्या मखमली आवाजाने तिने 'पॉप म्युझिक'च्या दुनियेतही स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं होतं.
advertisement
2/8
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. यशाच्या शिखरावर असतानाच एका अशा आजाराने घाला घातला की, तिचं हसणारं-खिदळणारं आयुष्य एका रात्रीत अंधारात गेलं. ही अभिनेत्री आणि प्रसिद्ध रॅपर-गायिका आहे रागेश्वरी लूंबा.
advertisement
3/8
१९९३ मध्ये आलेल्या 'आंखें' या सुपरहिट चित्रपटातून रागेश्वरीने पदार्पण केलं. त्यानंतर 'मैं खिलाडी तू अनाडी' मध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खानसोबत तिची जोडी जमली. ती केवळ अभिनेत्री नव्हती, तर एमटीव्हीची (MTV) सर्वात लोकप्रिय व्हीजे (VJ) होती. 'दुनिया' आणि 'प्यार का राग' सारखी तिची अल्बम्स तुफान हिट झाली.
advertisement
4/8
पण साल २००० मध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आपल्या वडिलांसोबत एक म्युझिक अल्बम लाँच केल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात रागेश्वरीला मलेरिया झाला. पण हा साधा मलेरिया नव्हता, तर त्यातून तिला 'बेल्स पाल्सी' नावाच्या गंभीर आजाराने घेरलं. या आजारामुळे तिच्या चेहऱ्याच्या अर्ध्या भागाला पॅरालिसिस झाला. तिचं बोलणं बंद झालं, चेहऱ्याचे स्नायू निकामी झाले आणि झगमगत्या ग्लॅमरच्या जगातून तिला बाहेर पडावं लागलं.
advertisement
5/8
रागेश्वरीने हार मानली नाही. तिने स्वतःच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, जेव्हा तिचा चेहरा वाकडा झाला होता आणि आत्मविश्वास पूर्णपणे तुटला होता, तेव्हा तिने योगाचा आधार घेतला. शेकडो विद्यार्थ्यांच्या गर्दीत ती आपला अर्धवट लुळा पडलेला चेहरा घेऊन योगा क्लासला जायची.
advertisement
6/8
तिथे तिला तिच्या गुरूंनी शिकवलं की, स्वतःच्या कमतरता स्वीकारणं हीच खरी ताकद आहे. पुढील एक वर्ष फिजिओथेरपी आणि योगाच्या जोरावर तिने या आजारावर मात केली. आजारातून सावरल्यानंतर रागेश्वरीने ग्लॅमरस जगाचा मोह सोडला आणि स्वतःला आध्यात्मिक मार्गाकडे वळवलं.
advertisement
7/8
२०१२ मध्ये ती लंडनला शिफ्ट झाली, जिथे तिची भेट मानवाधिकार वकील सुधांशु स्वरूप यांच्याशी झाली. वयाच्या ३९ व्या वर्षी रागेश्वरीने आणि ४१ व्या वर्षी सुधांशु यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. त्यांच्या प्रेमाची गोष्ट आजही अनोखी आहे; ते आजही एकमेकांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याऐवजी हाताने लिहिलेली पत्रं देतात.
advertisement
8/8
आज रागेश्वरी लूंबा ही एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर जगप्रसिद्ध माइंडफुलनेस आणि मॅनिफेस्टेशन कोच म्हणून ओळखली जाते. ती 'पेंग्विन इंडिया'ची लेखिका आहे आणि जगभरातील लोकांना मानसिक शांतता आणि यशाचा मंत्र देते. तिला आता १० वर्षांची एक मुलगी आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर राहून रागेश्वरी आज हजारो लोकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
16 व्या वर्षी डेब्यू, पहिलीच फिल्म ठरली ब्लॉकबस्टर; एका आजाराने उद्ध्वस्त केलं आयुष्य, आता कुठे आहे अभिनेत्री?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल