अमेरिका-इराण युद्धाची झळ भारताला! घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले, मुंबई ते दिल्ली किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतात LPG, PNG, CNG, क्रूड ऑइलच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला आहे.
advertisement
1/6

मुंबई: अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध पेटलं आहे. युद्धाच्या झळा आता जगभरातील इतर देशांना बसायला लागल्या आहेत. त्यातल्या पहिल्या स्थानावर तर भारतच आहे. युद्धाच्या झळा भारतातल्या लोकांना बसणार आहेत. LPG, PNG, CNG, क्रूड ऑइलचा साठा मर्यादीत असल्याने या सगळ्याच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
advertisement
2/6
अमेरिकेनं भारताला रशियाकडून 30 दिवस क्रूड ऑइल घेण्याची परवानगी दिली असली. तरीसुद्धा इंधनाचा तुटवडा होऊ नये म्हणून ते सावधगिरीनं वापरण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोल पंप, CNG साठी मागच्या काही दिवसांपासून लोक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. त्यातच आता कर्मिशियल गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या असून त्यांचा पुरवठा देखील मर्यादीत केला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
3/6
या युद्धाच्या झळा आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ६० रुपयांनी वाढ केली आहे. हे नवे दर 7 मार्चपासून लागू करण्यात आले असून नव्या दरानुसारच आता ग्राहकांना गॅस सिलिंडर घ्यावे लागणार आहेत.
advertisement
4/6
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार 14 किलो वाला घरगुती गॅस सिलिंडर आता 853 रुपयांवरुन 913 रुपये करण्यात आला आहे. त्यासाठीच्या सब्सिडी देखील तूर्तास थांबवण्यात आल्या आहेत. 115 रुपयांनी कर्मशियल गॅस महाग केला आहे.
advertisement
5/6
दिल्लीत आता ९१३ रुपये मोजावे लागतील. मुंबई आणि चेन्नईत ही किंमत ९२५ रुपयांच्या पार गेली आहे. कोलकात्यात तर ९३९ रुपयांचा आकडा गाठला आहे. एप्रिल २०२५ पासून गॅसचे दर स्थिर होते, मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि गॅसच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली आहे.
advertisement
6/6
हॉटेल चालक आता जेवणाच्या थाळीचे दर वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाहेर खाणं देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. सरकारने नागरिकांना प्राथमिकता देऊन LPG गॅस सिलिंडरचं उत्पादन वाढवावं अशा सूचना दिल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
अमेरिका-इराण युद्धाची झळ भारताला! घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले, मुंबई ते दिल्ली किती मोजावे लागणार पैसे?