TRENDING:

IND vs ENG : कुणाला मिळणार होती सेमीफायनलची शेवटची ओव्हर? शिवम दुबेने सांगितली Inside Story

Last Updated:
Shivam Dube on IND vs ENG Semi Final Last Over : इंग्लंडला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज होती तर टीम इंडियाला दोन ते तीन चांगल्या बॉलची गरज होती. त्याचवेळी सूर्याने मोठा निर्णय घेतला अन् शिवम दुबेच्या हातात बॉल सोपवला होता.
advertisement
1/7
कुणाला मिळणार होती सेमीफायनलची शेवटची ओव्हर? शिवम दुबेने सांगितली Inside Story
भारत आणि न्यूझीलंडचे संघ आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. इंग्लंडचा सात रन्सने पराभव करून टीम इंडियाने सेमीफायनल गाठली आहे. या सामन्यात 20 वी ओव्हर महत्त्वाची ठरली.
advertisement
2/7
इंग्लंडला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज होती तर टीम इंडियाला दोन ते तीन चांगल्या बॉलची गरज होती. त्याचवेळी सूर्याने मोठा निर्णय घेतला अन् शिवम दुबेच्या हातात बॉल सोपवला होता.
advertisement
3/7
सूर्याच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. व्हाईस कॅप्टन असलेल्या अक्षर पटेलची ओव्हर शिल्लक असताना दुबेला ओव्हर का दिली? असा सवाल विचारू लागला. अशातच अखेर दुबेने यावर मोठं वक्तव्य केलं.
advertisement
4/7
मला माहिती होतं की, शेवटच्या ओव्हरचे पहिले दोन बॉल आमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण पहिल्या दोन बॉलनंतर मॅच आमच्या बाजूने झुकणार होती, असंही शिवम दुबे म्हणाला.
advertisement
5/7
मला माहिती होतं की, शेवटची ओव्हर माझ्याकडेच येणार. मी तशी मानसिक तयारी करून बसलो होतो. मला नक्कीच भीती देखील वाटत होती. कारण सेमीफायनल सारख्या सामन्यात शेवटची ओव्हर करणं म्हणजे मोठ्या जोखमेचं काम असतं, असं दुबे म्हणाला.
advertisement
6/7
इंग्लंडचा जेब बेथल त्याचं शतक पूर्ण करून बसला होता. त्यामुळे मला माहिती होतं की, शेवटची ओव्हर टाकणं माझ्यासाठी सोपं नसेल. त्यावेळी मी स्वत:वर विश्वास ठेवला अन् माझ्या हिमतीवर ओव्हर टाकली, असंही शिवम दुबे यावेळी म्हणाला.
advertisement
7/7
दरम्यान, टीम इंडियाने आता सेमीफायनलमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. टीम इंडियासमोर न्यूझीलंडसारख्या टीमचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे फायनल रोमांचक होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : कुणाला मिळणार होती सेमीफायनलची शेवटची ओव्हर? शिवम दुबेने सांगितली Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल