फोटोमध्ये हसणारा हा अभिनेता आजही तितकाच गोड हसतो. नेहमी पॉझिटिव्ह राहणाऱ्या या अभिनेत्याची लव्ह स्टोरी तुम्हाला भावुक करेल. त्याने जिच्यावर प्रेम केलं ती त्याला सोडून गेली. नशिबाच्या पुढ्यात कोणाचं काही चालत नाही असं म्हणतात ते खरं. अभिनेत्याचं लग्न त्याच्या कॉलेजमधील सीरियशी झालं. आधीच विवाहित आणि एका मुलाची आई असलेल्या अभिनेत्रीशी त्यानं लग्न केलं. अभिनेत्याचा आज चाळीसहून अधिक वर्षांचा सुखाचा संसार आहे.
advertisement
( माजी मुख्यमंत्र्यांची होणारी नातसून, 29 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण; लॅविश आयुष्य जगतेय अभिनेत्री )
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणेजच अनुपम खेर. अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 40 वर्षे झाली आहेत. त्यांची मैत्री चंदीगडमधील कॉलेजमध्ये असताना सुरू झाली आणि मुंबईत पुन्हा भेटल्यानंतर ते प्रेमात पडले. किरण खेर या अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्या आधीच विवाहित आणि एका मुलाची आई होत्या.
अनुपम खेर त्या दिवसांची आठवण करून देत एका मुलाखतीत म्हणाले, "मी लग्न केलेले नव्हते. किरण विवाहित होती आणि आम्ही 12 वर्षे जिवलग मित्र होतो. ती कॉलेजमध्ये माझी सिनियर होती. ती एक स्टार होती. ती तिच्या वर्गातील नंबर वन अभिनेत्री आणि भारतीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू होती. मी मुंबईत राहायला गेलो आणि लग्नानंतर ती गौतम बेरीसोबत मुंबईत राहायला आली. माझ्या संघर्षाच्या दिवसांत सतीश कौशिक आणि मी अनेकदा किरण आणि गौतमच्या घरी जेवायला जायचो. ती आम्हाला टॅक्सीसाठी 50 रुपये द्यायची पण आम्ही ते पैसे वाचवून बसने प्रवास करायचो."
अनुपम यांनी सांगितलं की, "जेव्हा ती तिच्या लग्नात कठीण काळातून जात होती आणि मी वाईट नात्यात होतो. तेव्हा मी ज्या मुलीसोबत होतो ती मला सोडून गेली. तेव्हा किरण आणि मी प्रेमात पडलो आणि लग्न केले."
किरण आणि अनुपम खेर यांनी 1985 मध्ये लग्न केलं. हे किरण यांचं दुसरं लग्न होतं. लग्नानंतर अनुपम यांनी किरण खेर यांचा मुलगा सिकंदर याला दत्तक घेतलं आणि त्याला आपलं आडनाव दिलं. किरण यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांचा पहिला नवरा गौतमने नंदिनी सेनशी लग्न केलं.
