Mumbai Tunnels: मुंबईकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका, भुयारी मार्गाचा मेगा प्लॅन समोर!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबईकरांचा प्रवास आणखीनच जलद होणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी लवकरच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागातील नागरिकांच्या सेवेत नव्याने भुयारी मार्ग दाखल होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी बजेट सादर करत भुयारी मार्गाचा मेगा प्लॅनही जाहीर केला आहे, तो कशा पद्धतीने असेल, जाणून घेऊया...
advertisement
1/7

केव्हाही प्रवास करा, कायमच नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे नोकरदारांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय. घरी जातानाही आणि ऑफिसमध्ये येतानाही नोकरदारांचा मोठ्या प्रमाणावर वेळ ट्रॅफिकमध्येच जातोय..
advertisement
2/7
मुंबईसह उपनगारातील काही प्रमुख ठिकाणं जोडणाऱ्या भूयारी मार्गांचे कामे केव्हापर्यंत पुर्ण होणार? याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पामध्ये दिली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील भूयारी मार्ग केव्हापर्यंत पूर्ण होणार? एका क्लिकवर जाणून घेऊयात...
advertisement
3/7
मुंबई पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या गोरेगाव- मुलुंड भूयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिप टप्प्यामध्ये आहे. काम किती दिवसांत पूर्ण होणार? याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. अनेक नोकरदारांसाठी हा मार्ग सोयीचा ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
18,838 कोटी खर्चून ठाणे- बोरिवली भूयारी मार्गाचे काम जून 2028 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. ठाण्यातून बोरिवलीला जाणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास यामुळे अधिकच सोप्पा होणार आहे. या भूयारी मार्गामुळे नोकरदारांना जास्त वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
advertisement
5/7
खारघर- तुर्भे मार्गावर 2100 कोटींचा भूयारी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास अधिकच जलद आणि सोप्पा होणार असून नोकरदारांना हा नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
advertisement
6/7
बांद्रा- वरळी सी लिंक ते बुलेट ट्रेन स्टेशन आणि बीकेसी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्व प्रमुख ठिकाण एकात्मिक भूयारी मार्ग रस्ता प्रकल्प अंतर्गत जोडले जात आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सोप्पा होणार आहे. यामुळे अनेक वेळ प्रवाशांचा वाचणार आहे.
advertisement
7/7
तर ठाण्यातील गायमुख ते फाऊंटन हॉटेल हा 6 किमीचा भूयारी मार्ग आणि फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा 9 किमीचा उन्नत मार्ग अद्याप सुचवण्यात आलेला आहे. यावर विचार करण्यात आलेला नाही. लवकरात लवकर यावर निर्णय घेतला जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Tunnels: मुंबईकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका, भुयारी मार्गाचा मेगा प्लॅन समोर!