IND vs NZ : 'काहीही करा, पण अभिषेकला बाहेर बसवा', फायनलआधी टीम इंडियात चाललंय काय? कुणी सुचवला उपाय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दरम्यान या फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार का?असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
1/8

रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे.या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/8
फायनल सामन्यासाठी टीम इंडिया मैदानात प्रचंड घाम गाळते आहे.न्यूझीलंड देखील सरावात कोणतीही कसर सोडत नाही आहे.
advertisement
3/8
दरम्यान या फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार का?असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
4/8
टीम इंडियाकडून अभिषेक शर्माला संघाबाहेर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण एक अर्धशतकीय खेळी वगळता अभिषेक शर्मा संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आऊट ऑफ फॉर्म दिसला आहे.त्यामुळे त्याचा पत्ता कट होईल, असे बोलले जात आहे.
advertisement
5/8
टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंकडून देखील असाच पर्याय सूचवला जात आहे. काहीही करा पण अभिषेक शर्माला बाहेर बसवा, असे टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफ म्हणाला आहे.
advertisement
6/8
गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी फायनल सामन्यात कोणताही संकोच न करता बदल करावा आणि अभिषेक शर्माला फायनल सामन्यात ब्रेक द्यावा,असा मोहम्मद कैफने सल्ला दिला आहे.
advertisement
7/8
तसेच तुम्हाला आता संजूच्या रूपात चांगला ओपनर मिळाला आह. त्यामुळे संघातला बदल तुमच्या पथ्यावर पडणार आहे. रिंकु सिंह बेंचवर बसला आहे, त्याला संघात घ्या,त्याने टेस्ट, रणजी आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, असे देखील मोहम्मद कैफ म्हणाला आहे.
advertisement
8/8
दरम्यान आता ही गोष्ट पाहता फायनल सामन्यात गौतम गंभीर काय बदल करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 'काहीही करा, पण अभिषेकला बाहेर बसवा', फायनलआधी टीम इंडियात चाललंय काय? कुणी सुचवला उपाय?