TRENDING:

Dombivli: सोसायटीच्या परिसरात गाडी लावताय? डोंबिवलीत घडली धक्कादायक घटना, VIDEO समोर

Last Updated:

डोंबिवली पूर्व येथील नांदिवली पाडा इथं संखेश्वर नगरजवळ असलेल्या गोकुळधाम सोसायटीच्या परिसरात हा संतापजनक प्रकार घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली: पुण्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी जाळण्याच्या घटना कायम घडत असतात, आता गााड्या जाळण्याचं लोण कल्याण डोंबिवलीमध्ये पोहोचलं आहे. डोंबिवली पूर्व भागामध्ये स्कुटीवरून आलेल्याा दोन अज्ञात तरुणांनी मारुती सुझुकी एर्टिंगा पेटवून दिली. हे दोन्ही तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील नांदिवली पाडा इथं संखेश्वर नगरजवळ असलेल्या गोकुळधाम सोसायटीच्या परिसरात हा संतापजनक प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळी स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी उभी असलेल्या मारुती सुझुकी एर्टिगावर पेट्रोल टाकून तिला आग लावली.

[video width="738" height="554" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/dombivali-2026-03-59ac200a03eafd41536a54b65b44f69b.mp4"][/video]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या रोहित सरोज यांची ही गाडी होती. सरोज यांची सुमारे १२ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी एर्टिगा VXI(O) CNG ही कार परिसरात नेहमी उभी असते.  ६ मार्च २०२६ रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुण स्कुटीवर आले.  त्यानंतर बॉटलमध्ये आणलेलं पेट्रोल कारवर टाकून तिला आग लावून घटनास्थळावरून पळून गेले. गाडीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी धाव घेऊन गाडीला लागलेली आग विझवली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अबब! मक्याच्या एका ताटाला चक्क लागली 8 कणीसे, शेतकऱ्याच्या प्रयोगाची गावात चर्चा
सर्व पहा

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून यामध्ये हे दोन्ही तरुण आढळून आाले आहे.  या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरोज यांच्या एर्टिगा गाडीला कुणी आग लावली, कारण काय होतं, याची माहिती अद्याप समोर आली आहे.   संबंधित अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी रोहित सरोज यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Dombivli: सोसायटीच्या परिसरात गाडी लावताय? डोंबिवलीत घडली धक्कादायक घटना, VIDEO समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल