Famous Food Pune : 112 वर्षांपासून पुण्यातील प्रसिद्ध इराणी बेकरी, जगात कुठेच मिळणार नाही असे पदार्थ!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
112 वर्षे जुन्या असलेल्या रॉयल बेकरीने आपली खास चव जपली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
1/7

पुणे शहरात अनेक जुनी ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे कॅम्प परिसरातील रॉयल बेकरी हे होय.
advertisement
2/7
112 वर्षे जुन्या असलेल्या रॉयल बेकरीने आपली खास चव जपली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
3/7
1914 साली योहान इराणी यांच्या पणजोबांनी या बेकरीची सुरुवात केली होती. ज्या इमारतीत ही बेकरी आहे ती इमारत ब्रिटिश राजवटीत डिझाइन करण्यात आली होती. वसाहतकालीन उंच छत, बंद उंच खिडक्या आणि हवेशीर समोरील रचना आजही त्या काळाची साक्ष देतात.
advertisement
4/7
या ठिकाणी पारंपरिक पाककृती मिळतात. त्यामधीलच एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे श्रूसबेरी कुकी आहे.योहान यांच्या मते, भारतीय पद्धतीने तयार करण्यात आलेली पहिली इंडियन श्रूसबेरी बिस्किटे याच बेकरीत तयार झाली. त्या काळात श्रूसबेरी बिस्किट, मावा केक आणि ब्रेडपासून व्यवसायाची सुरुवात झाली होती.
advertisement
5/7
या ठिकाणी 112 वर्षे एकाच पारंपरिक पद्धतीने पदार्थ तयार केले जात असल्यामुळे चवीत सातत्य टिकून आहे. सुरुवातीला पाच ते सहा रुपयांत मिळणारे बन आणि इतर पदार्थ आजही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. पूर्वी पाच आण्याला उत्पादने मिळत असत, अशी माहितीही योहान यांनी दिली.
advertisement
6/7
तुम्हाला 30 ते 40 विविध प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी इथे मिळतील. यामध्ये नट बिस्किट, चोको चिप बिस्किट, बदामी बिस्किट, इलायची बिस्किट, नानकट, क्रीम रोल, ब्राऊनी, मावा केक, ब्रेड यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. अनेक जुने ग्राहक आजही आपल्या पुढच्या पिढीसोबत येथे आवर्जून येतात.
advertisement
7/7
ही बेकरी केवळ खाद्यपदार्थ विकणारे ठिकाण नसून पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा एक जिवंत वारसा आहे. बदलत्या काळानुसार आधुनिकता स्वीकारली असली तरी मूळ चव आणि परंपरा कायम राखण्यात रॉयल बेकरी यशस्वी ठरली आहे. 112 वर्षांचा हा प्रवास म्हणजे सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous Food Pune : 112 वर्षांपासून पुण्यातील प्रसिद्ध इराणी बेकरी, जगात कुठेच मिळणार नाही असे पदार्थ!