Knowledge : शर्टच्या कॉलरखालील त्या छोट्या बटणाचं काम काय? 99 टक्के लोक देतील चुकीचं उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटते की ही केवळ एक 'स्टाईल' किंवा 'डिझाइन' आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही चुकताय. या इवल्याशा बटणांमागे एक अतिशय रंजक इतिहास आणि सुरक्षेचे मोठे कारण दडलेले आहे.
advertisement
1/6

आपल्यापैकी बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात आरशासमोर उभे राहून, इस्त्री केलेला कडक शर्ट घालून होते. समोरची बटणे लावणे, मनगटावरचे कफ्स नीट करणे ही आपली रोजची सवय. पण काही शर्टच्या कॉलरच्या टोकावर (Points) छोटी बटणे दिलेली असतात, ती का असतात? त्याचं काम काय? असा कधी विचार केलाय का?
advertisement
2/6
अनेकांना वाटते की ही केवळ एक 'स्टाईल' किंवा 'डिझाइन' आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही चुकताय. या इवल्याशा बटणांमागे एक अतिशय रंजक इतिहास आणि सुरक्षेचे मोठे कारण दडलेले आहे. ज्याला आपण आज 'बटण-डाउन कॉलर' (Button-down Collar) म्हणतो, त्याचा शोध फॅशन रॅम्पवर नाही, तर खेळाच्या मैदानात लागला होता.
advertisement
3/6
खेळाच्या मैदानातून झाला उगमया बटणाचा इतिहास थेट 'पोलो' या खेळाशी जोडलेला आहे. जुन्या काळी, जेव्हा खेळाडू घोड्यावर बसून वेगाने पोलो खेळायचे, तेव्हा वेगामुळे आणि वाऱ्यामुळे त्यांच्या शर्टची कॉलर वारंवार उडून त्यांच्या तोंडावर किंवा डोळ्यांवर येत असे. यामुळे खेळाडूचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असायची.
advertisement
4/6
घोडेस्वारी करताना किंवा वेगाने धावताना कॉलर 'फडकून' नजर हटू नये, म्हणून खेळाडूंनी कॉलरच्या टोकांना शर्टला बटणाने ठोकून घेण्यास सुरुवात केली. यामुळे कॉलर आपल्या जागी स्थिर राहू लागली आणि खेळाडूंना कोणताही अडथळा न येता खेळता येऊ लागले.
advertisement
5/6
'बटण-डाउन' कॉलर आणि आधुनिक फॅशनकाळाप्रमाणे हा पोलो खेळाडूंचा जुगाड फॅशन विश्वात लोकप्रिय झाला. फॅशन डिझाइनर्सच्या मते, हे बटण केवळ कॉलरला जागेवर धरून ठेवत नाही, तर शर्टला एक 'क्लासी' आणि नीटनेटका लूक देते.
advertisement
6/6
शिस्तबद्ध लूक: जेव्हा तुम्ही टाय लावत नाही, तेव्हा ही बटणे कॉलरला पसरण्यापासून रोखतात.या बटणामुळे तासनतास प्रवास केल्यानंतरही कॉलरचा आकार बिघडत नाही.आजही खेळाडू किंवा प्रवाशांसाठी हे बटण कॉलर स्थिर ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Knowledge : शर्टच्या कॉलरखालील त्या छोट्या बटणाचं काम काय? 99 टक्के लोक देतील चुकीचं उत्तर