शेंगदाणे की मखाना? वजन कमी करण्यासाठी काय चांगलं? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
वजन कमी करताना सर्वात मोठे आव्हान असते मधल्या वेळेच्या भुकेवर नियंत्रण ठेवणे. अशा वेळी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये शेंगदाणे आणि मखाना याचा समावेश होतो.
advertisement
1/7

आजकाल अनेकांना वजन वाढण्याची समस्या जाणवत आहे. याला वेगवेगळे कारणे पण आहेत. यामध्ये जंक फूड, बिघडलेली झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. यामध्ये डायटिंग, जिम, आणि डिटॉक्स प्लॅन करतात.
advertisement
2/7
मात्र वजन कमी करताना सर्वात मोठे आव्हान असते मधल्या वेळेच्या भुकेवर नियंत्रण ठेवणे. अशा वेळी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये शेंगदाणे आणि मखाना याचा समावेश होतो. यामध्ये वजन कमी करण्यासाठी अधिक उपयुक्त काय? याबद्दल आहार तज्ज्ञ स्नेहा परांजपे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
शेंगदाणे प्रथिने, फायबर्स, आणि अत्यावश्यक जीवनसत्त्वांनी भरपूर असतात. शेंगदाण्यांमध्ये तंतू जास्त असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारतात आणि दीर्घकाळ तुम्हाला ताजेतवाने ठेवतात, असे स्नेहा परांजपे सांगतात.
advertisement
4/7
शेंगदाण्यांमध्ये कॅलरीजही जास्त असतात त्यामुळे त्यांचे प्रमाण योग्य ठरवणे आवश्यक आहे. 5-6 शेंगदाण्यांचे सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचे उच्च कॅलरी प्रमाण अधिक प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते.
advertisement
5/7
मखाना हा कमी कॅलरी असलेला पौष्टिक पर्याय आहे. यामध्ये कमी फॅट्स, उच्च प्रथिने आणि फायबर्स असतात. मखाना खाल्ल्यामुळे आपली भूक नियंत्रणात राहते. तसेच पचन प्रक्रियेवरही सुरळीत राहते.
advertisement
6/7
मखानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात. जे शरीराच्या विविध कार्यांना मदत करतात. मखाना हलका असून त्यात कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.
advertisement
7/7
स्नेहा परांजपे सांगतात की, वजन कमी करण्यासाठी मखाना चांगला आहे. त्यामध्ये कमी कॅलरी आणि उच्च पोषणतत्त्वांचा समावेश असतो. तसेच शेंगदाणे देखील कमी प्रमाणात खास करून भूक नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आपला आहार संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
शेंगदाणे की मखाना? वजन कमी करण्यासाठी काय चांगलं? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला