TRENDING:

Randeep Hooda: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाला बाबा; वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म, पाहा पहिली झलक

Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत 'गुड न्यूज' शेअर केली आहे. रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्रामला कन्यारत्न झाला असून चाहत्यांकडून इन्स्टाग्रामवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
advertisement
1/5
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाला बाबा; वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म, पाहा Photo
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा बाबा झाला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत 'गुड न्यूज' शेअर केलेली आहे. रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम हिला कन्यारत्न झाला असून चाहत्यांकडून इन्स्टाग्रामवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
advertisement
2/5
"आजोबांना आणि नातीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आज, मी वडील झालो आहे. तुमच्याप्रति माझी कृतज्ञता आणखी वाढली आहे, बाबा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लीन मला वडील बनवण्यासाठी आणि या घरात छोट्या परीला जन्म दिल्याबद्दल तुझे मनापासून आभार" अशी पोस्ट अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.
advertisement
3/5
आजच (10 मार्च) रणदीपच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं असून अभिनेत्याच्या वडीलांचा आणि त्याच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. रणदीपच्या वडिलांनी आपल्या लाडक्या नातीला उचलून घेतलेला फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. शिवाय, मुलीच्या हाताचा फोटोही अभिनेत्याने पोस्ट केला.
advertisement
4/5
रणदीप हुड्डाने इन्स्टाग्रामवर 'गुड न्यूज' शेअर करताच, चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. फॅन्स आणि सेलिब्रिटींकडून कौतुक करत रणदीपच्या मुलीवरही प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. काही तासांपूर्वीच रणदीपने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे.
advertisement
5/5
रणदीप हुड्डा आणि लिन लैशरामने नोव्हेंबर 2025 मध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यावेळी या सेलिब्रिटी कपलने लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. रणदीप आणि लिनने जंगलमध्ये फोटोशूट करत प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Randeep Hooda: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाला बाबा; वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म, पाहा पहिली झलक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल