TRENDING:

Ruchita Jamdar: 'मला घराबाहेर काढण्यासाठी तिने...', BBM6 मधून बाहेर येताच रुचिताचा संताप, केली तन्वी कोल्तेची पोलखोल

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: घराबाहेर येताच रुचिताने घरातील स्पर्धकांची पोलखोल करायला सुरुवात केली आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने तन्वी कोल्तेच्या गेमबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
advertisement
1/9
'मला घराबाहेर काढण्यासाठी तिने...', घराबाहेर येताच रुचिताने केली तन्वीची पोलखोल
बिग बॉसचं घर म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतात, ते म्हणजे घरात होणारी कडाक्याची भांडणं आणि एकमेकांशी भांडणारे स्पर्धक. मराठी बिग बॉसच्या या सीझनमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतोय.
advertisement
2/9
मात्र या पर्वातील तंटा क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या रुचिता जामदारला आठव्या आठवड्यात प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि घरातील प्रत्येक स्पर्धकाला जणू शॉकच बसला.
advertisement
3/9
या पर्वात रुचिताचा आवाज सर्वांवर असायचा. भांडणात तिला रोखू शकेल असा कोणताच स्पर्धक नव्हता. तिला नेहमीच तिच्या भाषेवरून सुनावलं गेलं. इतकंच नाही, तर भाऊच्या धक्क्यावरही रितेशने तिची शाळा घेतली होती.
advertisement
4/9
दरम्यान, घराबाहेर येताच रुचिताने घरातील स्पर्धकांची पोलखोल करायला सुरुवात केली आहे. नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तन्वी कोल्तेच्या गेमबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
advertisement
5/9
भाषेवरून स्पष्टीकरण देताना रुचिता म्हणाली, "ही खूप सामान्य भाषा आहे. गावाकडे असंच बोललं जातं. मराठी सिनेमांमध्ये हे शब्द वापरले आहेत. असे खूप लोक आहेत, ज्यांनी शिव्या दिल्या आहेत. आई-वडिलांवरून शिव्या दिल्या आहेत. चारित्र्यावरून बोलले आहेत. खूप घाण बोलले आहेत. राखी बोलली आहे, पण ती बोलली म्हणून गमतीने घेतलं आणि मी बोलले तर वेगळ्या अँगलने घेतलं."
advertisement
6/9
तन्वीला खरकटी बोलल्यामुळे तिला रितेशने सुनावलं होतं. यावर उत्तर देताना रुचिताने सांगितलं, "मी कधीच वेगळ्या अर्थाने तो शब्द वापरला नव्हता. मला तन्वीचा गेम पहिल्या दिवसापासून कळला होता."
advertisement
7/9
रुचिता पुढे म्हणाली, "तन्वीला माहित होतं की मी टास्कमध्ये आक्रमक होते. तिला हवं होतं की मी कुठेतरी हातापाई करावी आणि शोच्या बाहेर जावं. म्हणून तिने एक नवी स्ट्रॅटेजी काढली होती की, रुचिताच्या इतक्या जवळ जायचं की कुठेतरी धक्काबुक्की होईल आणि ती शोच्या बाहेर जाईल."
advertisement
8/9
तन्वीची पोलखोल करत ती म्हणाली, "शोमध्ये सगळ्यांना माहीत होतं की मला स्मोकिंगचा त्रास आहे. मला तो वास सहन होत नाही. तन्वी प्रत्येक भांडणाआधी स्मोक करून यायची आणि माझ्या तोंडासमोर येऊन बोलायची, जे मला सहन होत नव्हतं. कदाचित तिने हे मुद्दाम केलं असेल, जेणेकरून मी तिला धक्का देईन. म्हणून मी तिला त्यावेळी खरकटी म्हणाले होते. मला तो वास येत होता."
advertisement
9/9
रुचिताच्या म्हणण्यानुसार तिच्या बोलण्याचा खूप वेगळा अर्थ काढण्यात आला होता. याबाबत तिने भाऊच्या धक्क्यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. पण शोमधून बाहेर आल्यानंतर तिला कळालं की ते दाखवण्यातच आलं नाही.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ruchita Jamdar: 'मला घराबाहेर काढण्यासाठी तिने...', BBM6 मधून बाहेर येताच रुचिताचा संताप, केली तन्वी कोल्तेची पोलखोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल