TRENDING:

थिएटरमध्ये येण्याआधीच OTT रिलीजची चर्चा, Dhurandhar 2 बाबत रणवीर सिंगने दिली मोठी अपडेट

Last Updated:
अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपट रिलीज आधीच चाहत्यांना उत्सुकता आहे ती ओटीटी रिलीजची... चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याचे अपडेट आले.
advertisement
1/6
थिएटरमध्ये येण्याआधीच OTTरिलीजची चर्चा, Dhurandhar 2बद्दल रणवीर सिंगने दिली अपडे
अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या 19 मार्चला चित्रपट भारतासह संपूर्ण जगभरात रिलीज होणार असून प्रेक्षकांना चित्रपट रिलीजच्या आदल्या दिवसापासूनच पहायला मिळणार आहे.
advertisement
2/6
असं असलं तरीही भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये चित्रपट रिलीजच्या आदल्या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी खास रणवीरच्या चाहत्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'धुरंदर' प्रमाणेच 'धुरंदर: द रिव्हेंज' सुद्धा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
3/6
'धुरंदर' नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज झालेला पण, 'धुरंदर: द रिव्हेंज' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार नाही. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट ' जियो हॉटस्टार' या ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये, टीझरमध्ये आणि ट्रेलरमध्येही ' जियो हॉटस्टार' ओटीटीचा लोगो वापरण्यात आला आहे.
advertisement
4/6
चित्रपट रिलीज झाल्याच्या 45 ते 60 दिवसांनंतर प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. 'धुरंदर' चित्रपट रिलीजच्या 8 आठवड्यांनी ओटीटीवर आला होता. सध्या सोशल मीडियासह सर्वत्रच रणवीर सिंगच्या 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळते.
advertisement
5/6
चित्रपटाच्या प्री- बुकिंगला सुरूवात झाली असून भारतासह परदेशातही चित्रपटाला जोरदारला प्रतिसाद मिळते. पेड- प्रीव्ह्यूमध्येही चित्रपटाने जबरदस्त कमाई केलेली आहे. इतकंच नाहीतर, चित्रपटाचे राइट्स विकूनही जबरदस्त कमाई झालेली आहे. म्युझिकल, ओटीटी, थिएट्रीकल आणि ब्रॉडकास्टिंग असे वेगवेगळे राइट्स विकून निर्माते मालामाल झाले आहे.
advertisement
6/6
'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटामध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि सारा अर्जुन सारखी तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर, बॉलिवूडमधील इतर काही बडे सेलिब्रिटीजही चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थिएटरमध्ये येण्याआधीच OTT रिलीजची चर्चा, Dhurandhar 2 बाबत रणवीर सिंगने दिली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल