उत्तर पुणे जिल्ह्यात दहशत वाढली, ‘त्या’ दोघांमुळे ‘लॉकडाऊन’ची स्थिती, एक जेरबंद, दुसरा कुठं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune Leopard: उत्तर पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या भागात दहशत वाढली असून नागरिक भयभीत झाले आहेत.
advertisement
1/7

गेल्या काही काळापासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. अशातच जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ बिबट्याचा वावर आढळला आहे.
advertisement
2/7
नारायणगाव परिसरात दोन बिबटे फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केलं. या बिबट्याने परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केरून त्याला फस्त केलं असून परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती.
advertisement
3/7
वनविभागाने 15 दिवसांपूर्वी खडकवाडी येथील कालव्याच्या पोटचारीजवळ पिंजरा लावला होता. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यात मादी बिबट जेरबंद झाली. मात्र, दुसरा बिबट्या अजूनही सापडला नाही. वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे.
advertisement
4/7
गेल्या दोन महिन्यांपासून या बिबट्याच्या जोडीचे खडकवाडी शिवारात वास्तव्य आहे. उसाच्या शेताजवळून जात असणाऱ्या मेंढपाळावर देखील या बिबट्याने हल्ला केला होता. या भागातील पाळीव कुत्री आणि जनावरे देखील त्यांनी फस्त केली आहेत.
advertisement
5/7
खडकवाडी शिवारात पकडेला बिबट्या जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आला आहे. या ठिकाणई देखील बिबट्यांची संख्या वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार या परिसरातून आतापर्यंत 100 हून अधिक बिबटे पकडण्यात आले आहेत.
advertisement
6/7
दरम्यान, माणिकडोह बिबट केंद्रात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच या केंद्रातून 20 बिबटे गुजरातमधील वनतारा वाईल्डलाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिएशन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत. यात 10 नर आणि 10 मादींचा समावेश आहे.
advertisement
7/7
उत्तर पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत आहे. ऊसतोडीनंतर आश्रयस्थाने नष्ट झाल्याने बिबटे गावाच्या परिसरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे माणूस आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी तर ‘लॉकाडाऊन’ सारखी स्थिती निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
उत्तर पुणे जिल्ह्यात दहशत वाढली, ‘त्या’ दोघांमुळे ‘लॉकडाऊन’ची स्थिती, एक जेरबंद, दुसरा कुठं?