
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करून जगज्जेतेपदावर नाव कोरणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे मुंबईत अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले. विश्वचषक उंचावून मायदेशी परतलेल्या आपल्या लाडक्या 'सूर्या'ची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे, याच सोसायटीत माजी खासदार राहुल शेवाळे देखील वास्तव्यास असून, त्यांनी शेवाळे कुटुंबीय आणि इतर सर्व सोसायटी सदस्यांच्या वतीने सूर्याचे जोरदार स्वागत केले. देवनारमध्ये सूर्याचे पाऊल पडताच ढोल-ताशांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सोसायटीतील महिलांनी विश्वविजेत्या कॅप्टनला ओवाळून आणि फुलांचा वर्षाव करून त्याचे औक्षण केले. कॅप्टन सूर्याच्या होमकमिंगचा हा खास व्हिडिओ नक्की पहा!