Soft Chapati : हॉटेलसारखी फुगलेली आणि नरम चपाती हवीय? पीठ मळताना ही एकच गोष्ट टाका आणि फरक पाहा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमच्याही बाबतीत असं घडत असेल, तर काळजी करू नका. चपाती मऊ होण्यासाठी फक्त कष्ट करून चालत नाही, तर त्यामागे एक छोटं 'शास्त्र' आहे. पिठात एक खास पदार्थ मिसळला की तुमची चपाती हॉटेल किंवा धाब्यासारखी मऊ होईल. जाणून घेऊया या खास टिप्स.
advertisement
1/8

सकाळची घाई असो किंवा रात्रीचा स्वयंपाक, ताटात जर गरम, फुलेली आणि मऊ लुसलुशीत चपाती असेल तर जेवणाची चव द्विगुणित होते. पण अनेकदा असं होतं की, चपाती तव्यावरून उतरवली की काही वेळातच ती वातड किंवा कडक होते. काही घरांमध्ये तर चपाती इतकी कडक होते की ती चावणं लहान मुलांना आणि वृद्धांना कठीण जातं. मग सुरू होतो तो पाण्याचा आधार घेण्याचा किंवा चपाती कुस्करून खाण्याचा प्रकार.
advertisement
2/8
जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल, तर काळजी करू नका. चपाती मऊ होण्यासाठी फक्त कष्ट करून चालत नाही, तर त्यामागे एक छोटं 'शास्त्र' आहे. पिठात एक खास पदार्थ मिसळला की तुमची चपाती हॉटेल किंवा धाब्यासारखी मऊ होईल. जाणून घेऊया या खास टिप्स.
advertisement
3/8
योग्य भांड्याची निवड आणि मिठाचे गणितचपातीचं पीठ मळताना नेहमी मोठ्या परातीचा किंवा बाऊलचा वापर करा. यामुळे पीठ व्यवस्थित मळता येतं. पीठ मळण्यापूर्वी पाण्यात थोडं मीठ घालून ते विरघळवून घ्या. यामुळे संपूर्ण पिठाला सारखी चव लागते आणि चपाती बेचव लागत नाही.
advertisement
4/8
पाणी घालताना 'ही' काळजी घ्यापीठ मळताना एकदम खूप पाणी ओतू नका. थोडं थोडं पाणी घालत पीठ मळा. जर पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होईल आणि चपाती लाटता येणार नाही. याउलट पाणी कमी पडलं तर पीठ कोरडं राहील आणि चपाती कडक होईल. पिठाचा गोळा लवचिक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
advertisement
5/8
'तो' एक खास पदार्थ: दुधाची जादूचपाती मऊ होण्यासाठीची सर्वात मोठी टीप म्हणजे दूध. पीठ मळून झाल्यावर त्यात 2 ते 4 चमचे 'स्किम्ड मिल्क' (कमी फॅटचं दूध) मिसळा. दुधामुळे पिठातील ग्लुटेनची रचना मऊ होते. यामुळे चपाती लाटणं सोपं जातं आणि ती तासनतास मऊ राहते. बॅचलर्स किंवा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी ही टीप 'गेम चेंजर' ठरू शकते.
advertisement
6/8
तेलाचा वापर आणि 'रेस्टिंग टाईम'पीठ मळून झाल्यावर त्यावर 2-3 चमचे तेल लावा आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्या. तेल लावल्यामुळे चपाती छान फुलते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पीठ मळल्याबरोबर लगेच चपात्या करू नका. पिठाचा गोळा किमान अर्धा ते एक तास झाकून ठेवा. यामुळे पिठात ओलावा टिकून राहतो आणि चपाती कापसासारखी मऊ होते.
advertisement
7/8
चपाती शेकतानाची ट्रिकचपाती लाटताना ती खूप पातळ किंवा खूप जाड नसावी. तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच चपाती त्यावर टाका. मंद आचेवर चपाती शेकल्यास ती कडक होते, त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवर चपाती पटकन शेकून घ्यावी.
advertisement
8/8
(टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Soft Chapati : हॉटेलसारखी फुगलेली आणि नरम चपाती हवीय? पीठ मळताना ही एकच गोष्ट टाका आणि फरक पाहा