'आईबाबांना सांगण्याचं धाडस...', मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर; शेअर केली काळीज पिळवटणारी पोस्ट; अभय देओलच्या कमेंटने लक्ष वेधलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajshri Deshpande Breast Cancer: राजश्रीला स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं असून तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. नुकतंच तिने हेल्थ अपडेट शेअर केली आहे.
advertisement
1/9

कॅमेरासमोर आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारी आणि 'सेक्रेड गेम्स'मध्ये सुभद्राच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या एका वेगळ्याच आणि कठीण लढाईला सामोरी जात आहे.
advertisement
2/9
पडद्यावर संकटांशी भिडणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एका जीवघेण्या आजाराशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. राजश्रीला स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं असून, नुकतीच तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे.
advertisement
3/9
विशेष म्हणजे, हा डोंगर ती एकटी पेलत होती, कारण आई-वडिलांना हे सांगण्याची हिंमत तिला होत नव्हती. राजश्रीने सोशल मीडियावर आपल्या हॉस्पिटलमधील बेडवरील फोटो शेअर करत ही धक्कादायक माहिती दिली.
advertisement
4/9
तिने लिहिलंय, "हे तुम्ही वाचत आहात, याचा अर्थ असा की आता माझ्या आई-वडिलांना हे सत्य सांगण्याचं धाडस माझ्यात आलंय. मला 'इनफिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा' म्हणजेच ग्रेड १ चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. सुरुवातीला जेव्हा हे समजलं, तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती."
advertisement
5/9
राजश्रीने पुढे सांगितलं की, नियमित तपासणीमुळे हा आजार पहिल्या टप्प्यातच लक्षात आला. निदान झाल्यापासून ते शस्त्रक्रिया होईपर्यंतचा प्रवास एखाद्या रोलरकोस्टर सारखा होता. पण शस्त्रक्रियेनंतर जेव्हा तिने आई-बाबांचे चेहरे पाहिले, तेव्हा तिच्या मनातील सर्व भीती पळून गेली आणि तिला एक नवीन ताकद मिळाली.
advertisement
6/9
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये राजश्रीवर उपचार सुरू आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये डॉक्टरांच्या पथकाचे मनापासून आभार मानले आहेत. ती आता वेगाने सावरत असून लवकरच तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/9
"तुमचं प्रेम हेच माझं सर्वात मोठं औषध आहे, आता मी पुन्हा एकदा जग जिंकायला तयार आहे," असं म्हणत तिने आपल्या सकारात्मक वृत्तीचं दर्शन घडवलं.
advertisement
8/9
राजश्रीची ही पोस्ट पाहताच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिला धीर दिला आहे. अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने केवळ 'राज' अशी कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. इतकंच नाही, तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभय देओलनेही राजश्रीच्या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.
advertisement
9/9
तर अमृता खानविलकरने "तुला खूप प्रेम आणि हिंमत," असं म्हटलंय. छाया कदम यांनी तिला 'रॉकस्टार' संबोधत "काळजी घे गं," अशी साद घातली आहे. याशिवाय किरण राव, स्पृहा जोशी, तिलोत्तमा शोम आणि गौरव आदर्श यांसारख्या दिग्गजांनीही राजश्रीच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आईबाबांना सांगण्याचं धाडस...', मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर; शेअर केली काळीज पिळवटणारी पोस्ट; अभय देओलच्या कमेंटने लक्ष वेधलं