TRENDING:

Toxic च्या फॅन्सना झटका, Dhurandhar 2 ची चांदी! 19 मार्चला रिलीज होणार नाही यशची फिल्म, शॉकिंग कारण आलं समोर

Last Updated:
Toxic release postponed: ज्या चित्रपटाची फॅन्स टक लावून वाट पाहत होता, त्या Toxic बाबत एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
advertisement
1/8
Toxic फॅन्सना झटका, Dhurandhar 2ची चांदी! 19 मार्चला रिलीज होणार नाही यशची फिल्म
कन्नड सुपरस्टार यश याच्या अफाट लोकप्रियतेमुळे संपूर्ण देश ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता, त्या 'टॉक्सिक: ए फेअरी टेल फॉर गोन-अप्स' (Toxic) बाबत एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
advertisement
2/8
गेल्या चार वर्षांपासून ज्या 'रॉकी भाई'च्या कमबॅकची चर्चा होती, तो कमबॅक आता लांबणीवर पडला आहे. १९ मार्च रोजी जगभरात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असलेला हा चित्रपट आता नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही.
advertisement
3/8
मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक अस्थिरतेचा फटका या बिग बजेट सिनेमाला बसला आहे. 'टॉक्सिक'चे निर्माते आणि खुद्द यश याने हा चित्रपट एका ग्लोबल व्हिजनने बनवला आहे.
advertisement
4/8
हा सिनेमा केवळ कन्नडच नाही, तर इंग्रजी भाषेतही शूट करण्यात आला आहे, जेणेकरून जागतिक स्तरावर त्याला मोठी बाजारपेठ मिळावी. मात्र, सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय वितरण आणि प्रदर्शनावर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
5/8
अशा वातावरणात चित्रपट प्रदर्शित करणं धोक्याचं असल्याचं मानत, मेकर्सनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यशने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना सांगितलं की, प्रेक्षकांचे आणि पार्टनर्सचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
6/8
आता हा हायपर-वायलेंट ॲक्शन ड्रामा ४ जून २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात धडकणार आहे. निर्मात्यांना आशा आहे की, तोपर्यंत जागतिक परिस्थिती निवळेल आणि चित्रपटाला अपेक्षित असलेला भव्य प्रतिसाद मिळेल. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.
advertisement
7/8
यशच्या 'टॉक्सिक'ने माघार घेतल्याचा सर्वात मोठा आणि थेट फायदा बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग याला झाला आहे. रणवीरचा बहुप्रतिक्षित स्पाई थ्रिलर 'धुरंधर २' (Dhurandhar 2) देखील १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होणार होती.
advertisement
8/8
मात्र, आता 'टॉक्सिक' शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे रणवीर सिंगला 'सोलो रिलीज'ची सुवर्णसंधी मिळाली आहे. स्पर्धा नसल्यामुळे 'धुरंधर २' आता बॉक्स ऑफिसवर एकहाती सत्ता गाजवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Toxic च्या फॅन्सना झटका, Dhurandhar 2 ची चांदी! 19 मार्चला रिलीज होणार नाही यशची फिल्म, शॉकिंग कारण आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल