TRENDING:

बायको पाहिजे! स्टेशन, बस स्टॉप; उन्हातान्हात हातात बोर्ड घेऊन मुंबईभर फिरतोय मराठी अभिनेता

Last Updated:
Marathi Actor : मुंबईच्या रस्त्यावर एक मराठी अभिनेता फिरताना दिसला आहे. त्याच्या हातात बोर्ड आहे. ज्यावर 'बायको पाहिजे' असं लिहिलं आहे.
advertisement
1/7
बायको पाहिजे! स्टेशन, बस स्टॉप; हातात बोर्ड घेऊन मुंबईभर फिरतोय मराठी अभिनेता
गेले काही दिवस रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा होती. या साऊथ सेलिब्रिटी कपलने लग्नगाठ बांधली. विजयला त्याची रश्मिका मिळाली. आता एक मराठी अभिनेता त्याच्यासाठी बायको शोधतो आहे.
advertisement
2/7
बायको शोधण्यासाठी हा अभिनेता रस्त्यावर उतरला आहे. बायको पाहिजे' असा बोर्ड हातात घेऊन हा अभिनेता फिरतो आहे. लोकांना पॅम्प्लेट वाटताना दिसतो आहे.
advertisement
3/7
मुंबईत हा अभिनेता बायको शोधतो आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मुंबईभर उन्हातान्हात फिरत तो आपल्यासाठी बायको शोधतो आहे.
advertisement
4/7
बायको शोधणाऱ्या या अभिनेत्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 'मी धनराज धोंडीराज दांगट. बायको शोधतोय. तुमच्या ओळखीत आहे का कोणी?', असं तो पोस्टमध्ये म्हणतो आहे.
advertisement
5/7
हा व्हिडीओ पाहिल्यावर हा मराठी अभिनेता आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण हा चेहरा नवरा दिसतो आहे.
advertisement
6/7
दरम्यान बोर्डवर 'बायको पाहिजे, आशीर्वाद असू द्या', असा आशय आहे. तसंच स्टार प्रवाहचा लोगो आहे आणि स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
7/7
त्यामुळे हा व्हिडीओ म्हणजे स्टार प्रवाहवरील नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद' शी संबंधित असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बायको पाहिजे! स्टेशन, बस स्टॉप; उन्हातान्हात हातात बोर्ड घेऊन मुंबईभर फिरतोय मराठी अभिनेता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल