TRENDING:

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, उत्तर महाराष्ट्रात कशी असेल स्थिती? सोमवारी राज्यात संमिश्र वातावरण

Last Updated:
उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात गारवा कमी झालाय. काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/6
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, उत्तर महाराष्ट्रात सोमवारी कशी असेल स्थिती?
24 नोव्हेंबर रोजी मुंबईत अंशतः ढगाळ आकाश राहून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/6
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरांत मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/6
मराठवाड्यातील छ्त्रपती संभाजीनगर शहरांत निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मराठवाड्यातही गारवा कमी झालाय.
advertisement
4/6
उत्तर महाराष्ट्रातही गारवा काहीसा कमी झालाय. नाशिकमध्ये 24 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
5/6
विदर्भातील नागपूर जिल्ह्यांत मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातही गारवा काहीसा कमी झालाय. दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहे.
advertisement
6/6
राज्यात सध्या हवामानात मोठी चढ- उतारांची स्थिती दिसून येत आहे. काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासोबत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी गारवा कमी होऊन दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्येही अशीच मिश्र हवामानाची परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, उत्तर महाराष्ट्रात कशी असेल स्थिती? सोमवारी राज्यात संमिश्र वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल