Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना मोठा धक्का! एक एक करून सगळे सोडून गेले; सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख
- Published by:Priya Lad
Last Updated:
Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला कायमचं गमावलं आहे. ही व्यक्ती त्यांच्यापासून कायमची दूर गेली आहे, याचं दु:ख त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.
advertisement
1/7

अमिताभ बच्चन यांच्यासोबत फिल्ममध्ये काम करणाऱ्या कित्येक कलाकारांचं निधन झालं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांच्या निधनानेही अमिताभ यांना खूप दु:ख झालं होतं. आता त्यानंतर दोन महिन्यांनी अमिताभ यांनी त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला कायमचं गमावलं आहे.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राचं निधन झालं आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक इमोनशनल पोस्ट लिहिली आहे.
advertisement
3/7
अमिताभ यांनी त्यांच्या पोस्टमधून त्यांनी ज्या मित्राला गमावलं तो प्रत्येक अडचणीला कसं सोपं करायचं आणि कोणत्याही परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे सांगितलं आहे.
advertisement
4/7
अमिताभ बच्चन म्हणाले, "मी आणखी एक प्रिय मित्र गमावला आहे. तो प्रेमळ आणि आनंदी होता. तो असा माणूस होता जो प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा राहू शकत होता. तो सर्वात कठीण काळातही मार्ग काढू शकत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं. तो गेला आहे यावर मला विश्वासच बसत नाहीये"
advertisement
5/7
शेवटी अमिताभ यांनी एक एक करून ते सगळे सोडून जात आहेत, अशी ओळ लिहिली आहे. ज्यातून त्यांच्या हा मित्र किती जवळचा होता हे समजतं.
advertisement
6/7
अमिताभ यांचा हा जवळचा मित्र कोण, त्याला काय झालं होतं? त्याचं नाव आणि मृत्यूचं कारण अमिताभ यांनी सांगितलेलं नाही. पण त्यांच्या शब्दांतून त्यांना त्यांच्या मित्राच्या निधनाने झालेल्या वेदना स्पष्टपणे दिसून आल्या.
advertisement
7/7
बिग बी यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना धीर दिला आहे. तसंच त्यांच्या मित्राच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना मोठा धक्का! एक एक करून सगळे सोडून गेले; सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख