Esha Dey Real Surname : ईशा डे झाली खणकरांची सून, पण तिचं खरं आडनाव काही वेगळंच; लंडनला गेली अन् चेंज करून आली!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Esha Dey Real Surname : अभिनेत्री ईशा डे म्हणून सगळे ओळखतात. पण तुम्हाला माहिती आहे का तिचं खरं आडनाव डे नाहीच. ऐकून तुम्हीही शॉक व्हाल.
advertisement
1/8

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा डे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने गीतकार अभिषेक खणकरबरोबर लग्न केलं.
advertisement
2/8
लग्नानंतर ईशा आता खणकर कुटुंबाची सून झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंची जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
3/8
ईशाच्या लग्नाइतकाच एक वेगळा विषयही सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे तिचं खरं आडनाव. प्रेक्षकांना ईशा डे म्हणून ओळख असलेल्या या अभिनेत्रीचं मूळ आडनाव 'डे' नसून काहीतरी वेगळंच आहे.
advertisement
4/8
एका मुलाखतीत ईशाने स्वतःच तिच्या आडनावामागची रंजक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, "मी मराठी आहे, मी बंगाली नाही. माझं खरं आडनाव वडनेरकर आहे. म्हणजे माझं पूर्ण नाव ईशा वडनेरकर असं आहे." मग आता वडनेरकर असलेली ईशा डे कशी काय झाली.
advertisement
5/8
ईशाने सांगितलं की ती काही काळ लंडनमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होती. त्या काळात तिला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागत होत्या. मात्र तेथे एक वेगळीच अडचण तिच्यासमोर उभी राहिली.
advertisement
6/8
ईशा म्हणाली, "ऑडिशनसाठी साधारण 15 मिनिटांचा स्लॉट असायचा. तिथले लोक कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक असायचे. पण मी माझं नाव सांगितल्यानंतर त्यांना ते नीट समजतच नव्हतं. वडनेरकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना अडचण यायची.”
advertisement
7/8
ती पुढे म्हणाली, "तिथे 'व' आणि W, तसेच D चे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे माझं नाव समजावून सांगण्यातच बराच वेळ जायचा. कधी कधी 5 मिनिटं फक्त नाव उच्चारण्यातच निघून जायची. .मग आमचे ट्युटर होते त्यांनी मला सल्ला दिला की तू तुझं सोप नाव ठेव. त्यामुळे मी अगदी सहज ईशा डे... नाव आलं. हे छान साऊंड करतं होतं. मी म्हटलं घेऊन टाका असं म्हणून मी नाव दिलं".
advertisement
8/8
ईशा डे ही मराठीतील अत्यंत टॅलेटेंड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ईशाने लंडनमध्ये ड्रामा स्कूलमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. ती उत्तम कथ्थक डान्सर देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Esha Dey Real Surname : ईशा डे झाली खणकरांची सून, पण तिचं खरं आडनाव काही वेगळंच; लंडनला गेली अन् चेंज करून आली!