Summer Tips : वारंवार पाणी पिऊनही तहान भागत नाही? सावध व्हा! तुमचं शरीर डिहायड्रेट करतात 'हे' पदार्थ
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Food that dehydrates body : उन्हाळ्यात आपल्याला आपल्या हायड्रेशनची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. आपण कितीही पाणी प्यायलं तरी आपण खातो त्यातले काही पदार्थ असे आहेत, जे आपलं शरीर डिहायड्रेट करतात. चला जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहेत.
advertisement
1/5

सर्वात आधी आहेत कॅफिनयुक्त पेय. कॉफी, चहा असे कॅफिन असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीर डिहायड्रेट होते. कारण यामुळं लघवीला जास्त वेळा जावं लागतं आणि शरीरातलं पाणी कमी होतं. तसेच गोड पेये आणि एनर्जी ड्रिंक्समध्येही कॅफिन आणि साखर जास्त असल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो.
advertisement
2/5
अल्कोहोलबद्दल आपल्या सर्वांना माहित आहेच. अल्कोहोल प्यायल्याने आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी वेगाने कमी होतात. यामुळं डिफायड्रेशन होतं.
advertisement
3/5
हाय प्रोटीन डाएटमुळेही डिहायड्रेश होऊ शकतं. करा प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला जास्त कष्ट लागतात. यादरम्यान शरीराला पाणीही जास्त लागतं. यामुळं डिहायड्रेश होण्याची शक्यता वाढते.
advertisement
4/5
चिप्स, चिवडा आणि लोणचं अशा खारट स्नॅक्समध्ये सोडियम जास्त असते, जे शरीरातीळ पाण्यावर परिणाम करते. तसेच तळलेले पदार्थही उन्हाळयात पचायला जड जातात. यामुळे शरीरावर जास्तीचा ताण येतो आणि डिहायड्रेशन होण्याची भीती वाढते.
advertisement
5/5
प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडदेखील अ‍ॅडिटिव्ह्ज आणि सोडियमने समृद्ध असतात. हे डिहायड्रेशनला कारणीभूत ठरू शकतात. त्याचबरोबर रिफाइंड व्हाईट फूड आयटम, जे फायबरलेस असतात. ते आपल्याला शरीराला पचण्यासाठी खूप पाणी लागतं. हेही डिहायड्रेशनचं कारण बनतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : वारंवार पाणी पिऊनही तहान भागत नाही? सावध व्हा! तुमचं शरीर डिहायड्रेट करतात 'हे' पदार्थ