TRENDING:

ऑपरेशनसाठी आली नाही, रुम उघडताच काळजाचा ठोका चुकला, मुंबईतील बड्या रुग्णालयात महिला डॉक्टर आढळली मृत

Last Updated:

Woman Doctor Found Dead In Jagjivan Ram Hospital:  मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Woman Doctor Found Dead In Jagjivan Ram Hospital:  मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. अनुजा कुलकर्णी असं मृत डॉक्टरचं नाव असून, त्या कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या.
woman doctor found dead in jagjivan ram hospital
woman doctor found dead in jagjivan ram hospital
advertisement

नेमकी घटना काय?

डॉ. अनुजा कुलकर्णी या अविवाहित होत्या. रुग्णालयातील खोलीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्या काही नियोजित शस्त्रक्रिया होत्या. मात्र, त्या ठरलेल्या वेळात ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर डॉ. अनुजा या जमिनीवर निपचित पडलेल्या अवस्थेत आढळल्या. तातडीने तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

advertisement

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सध्या याप्रकरणी 'एडीआर' नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी महिला डॉक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पोलिसांनी रुग्णालयातील आणि संबंधित इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. डॉ. अनुजा यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, की घातपात आहे, याचा तपास पोलीस करत आहे. एका बड्या रुग्णालयात महिला डॉक्टरचा अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
ऑपरेशनसाठी आली नाही, रुम उघडताच काळजाचा ठोका चुकला, मुंबईतील बड्या रुग्णालयात महिला डॉक्टर आढळली मृत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल