कधी होणार वर्षातील दुसरे चंद्रग्रहण?
2026 मधील दुसरे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. हे एक खंडग्रास चंद्रग्रहण असेल. या काळात चंद्राचा सुमारे 93 टक्के भाग पृथ्वीच्या खोल सावलीत लपलेला असेल. यामुळेच या ग्रहणामुळे निरीक्षकांना जवळजवळ पूर्ण चंद्रग्रहणासारखे दृश्य दिसेल, जिथे बहुतेक चंद्र लाल रंगाचा दिसेल. काल जे ग्रहण झालं ते खग्रास चंद्रग्रहण होते आणि ते भारतातून दिसले. त्यामुळे आता पुढच्या ग्रहणाचे वेध खगोलप्रेमींना लागले आहेत. 28 ऑगस्टला होणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
हे ग्रहण भारतात दिसणार का?
खगोलप्रेमींसाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे, 28 ऑगस्ट 2026 रोजी होणारे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या काही पश्चिमेकडील भागांतून दिसणार आहे. भारतात हे ग्रहण दृश्यमान नसल्यामुळे, या ग्रहणाचे 'सूतक' किंवा 'वेध' भारतात पाळले जाणार नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामात किंवा मंदिर दर्शनात कोणताही अडथळा येणार नाही.
राशींवर काय होणार परिणाम?
जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे सूक्ष्म परिणाम सर्व 12 राशींवर होत असतात. हे ग्रहण कुंभ किंवा मीन राशीत असण्याची शक्यता आहे.
मीन आणि कुंभ रास: या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण मानसिक तणाव वाढवणारे ठरू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मेष, मिथुन आणि तूळ: या राशींना हे ग्रहण लाभदायी ठरू शकते. आर्थिक प्रगती आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.
सिंह आणि वृश्चिक: या राशीच्या जातकांनी वादावादी टाळावी आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे. भारतात ग्रहण दिसत नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, मात्र नामस्मरण आणि सकारात्मक विचार ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.
2026 मधील इतर ग्रहणे
17 फेब्रुवारी 2026: कंकणाकृती सूर्यग्रहण
3 मार्च 2026: खग्रास चंद्रग्रहण
12 ऑगस्ट 2026: खग्रास सूर्यग्रहण (भारतात दिसणार नाही)
28 ऑगस्ट 2026: खंडग्रास चंद्रग्रहण (भारतात दिसणार नाही)
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
