TRENDING:

Rashmika Vijay : विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणाऱ्या रश्मिका-विजयचं शिक्षण किती; कोण जास्त शिकलंय?

Last Updated:
Rashmika Vijay Education : रश्मिका-विजय या कपलने लग्नानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. पण हे दोघं स्वत: किती शिकले आहेत माहिती आहे का?
advertisement
1/7
विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणारे रश्मिका-विजय किती शिकलेत, कुणाचं शिक्षण जास्त?
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हे सध्या फक्त त्यांच्या लग्नामुळेच नव्हे तर त्यांच्या उदारतेमुळेही चर्चेत आहेत. उदयपूरमध्ये शाही आणि भव्य लग्नसोहळ्यानंतर हे कपल असं काही करताना दिसत आहे, ज्यामुळे लोकांची मनं त्यांनी अधिकच जिंकली आहेत.
advertisement
2/7
लग्नानंतर विजय आणि रश्मिका यांनी देशभर मिठाई वाटली, मंदिरात जाऊन अन्नदान केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिचीही घोषणा केली. नगरकुरनूल जिल्ह्यातील विजयच्या मूळ गावी पोहोचले. स्थानिकांना भेटताना विजयने एक महत्त्वाची घोषणा केली.
advertisement
3/7
त्यांनी त्यांच्या देवेरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट या एनजीओच्या माध्यमातून 44 सरकारी शाळांमधील मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. इयत्ता नववीआणि दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देणं, त्यांना आर्थिक अडचणींशिवाय उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणं हा त्यांच्या उद्दे.
advertisement
4/7
पण विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप जाहीर करणारे विजय आणि रश्मिका दोघं स्वत: किती शिकले आहे, त्यांचं शिक्षण किती, कोण कोणापेक्षा जास्त शिकलं आहे, याची माहिती घेऊयात.
advertisement
5/7
विजय देवरकोंडा पदवीधर आहे. त्याने आंध्र प्रदेशमधील पुट्टपर्ती येथील सत्य साई उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी हैदराबादमधील बद्रुका कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तो बी.कॉम झाला आहे.
advertisement
6/7
तर रश्मिका मंदान्ना कोडगु येथील कूर्ग पब्लिक स्कूलमध्ये होती. त्यानंतर तिने बंगळुरू येथील एमएस रामैया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्य या तीन विषयांमध्ये पदवी मिळवेलली आहे.
advertisement
7/7
विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना दोघंही ग्रॅज्युएट आहेत. म्हणजे त्यांचं शिक्षण समान आहे. पण पदवीच्या बाबतीत विजयपेक्षा रश्मिका अव्वल आहे. विजयने फक्त कॉमर्समध्ये पदवी मिळवली आहे. तर रश्मिकाने तीन विषयांत पदव्या मिळवल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Vijay : विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणाऱ्या रश्मिका-विजयचं शिक्षण किती; कोण जास्त शिकलंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल