Puranpoli : पुरण पातळ झालं, लाटताना पोळी फाटतेय! फसलेली पुरणपोळी परफेक्ट करण्यासाठी सोप्या ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Puranpoli : पुरणपोळी कशी बनवायची याचे भरपूर व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर मिळतील. पण पुरणपोळी फसली तर काय करायचं, फसलेली पुरणपोळी परफेक्ट करण्याची ट्रिक आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
advertisement
1/7

होळी म्हणजे पुरणपोळी आलीच. कित्येकांना पुरणपोळी आवडते. पण पुरणपोळी खायला जितकी मस्त तितकीच ती बनवायला कठीण. काही लोक पुरणपोळी बाहेरूनच ऑर्डर करतात किंवा कुणाकडून तरी बनवून घेतात. तर काही नाही मलासुद्धा पुरणपोळी यायला हवी मी शिकायला हवं असं म्हणून पुरणपोळीचा घाट घालतात.
advertisement
2/7
तुम्हीही पुरणपोळी करण्याचा विचार करत आहात किंवा पुरणपोळी बनवत असाल. कुणीतरी सांगितलं तसं किंवा सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून सगळं प्रमाणात घेऊन, सांगितलं तसं करून पुरणपोळीची तयारी केली. पुरणपोळी बनवायला घेतली. पण सगळं करूनही ती फसली... आता काय करायचं? इतकं पुरण, पीठ आणि मेहनत फुकट...
advertisement
3/7
बिलकुल नाही. पुरणपोळी कसं बनवायचं हे सगळेच तुम्हाला सांगतील पण फसलेली पुरणपोळीही परफेक्ट कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
4/7
पुरणपोळी फसणं म्हणजे काय तर एक तर पुरण पातळ होतं किंवा घट्ट किंवा पोळी लाटताना फाटते किंवा शेकवल्यावर ती कडक होते. या सगळ्या समस्यांवर उपाय आहे.
advertisement
5/7
पुरण पातळ झालं तर ते पुन्हा कढईत टाकून त्यात 1-2 चमचे भाजलेलं बेसन किंवा कणीक घालून परता. पुरण घट्ट होईल. पुरण कडक झालं असेल तर मिक्सरमध्ये थोडं गरम दूध किंवा पाणी घालून ते पुन्हा फिरवून घ्या. पुरण थोडं नरम होईल.
advertisement
6/7
पोळी लाटताना फाटते म्हणजे पीठ कडक आहे, पुरणपोळीचं पीठ जास्त घट्ट नसावं ते लुसलुशीत मैद्यासारखं असावं. म्हणून ते पुन्हा मळून तासभर ठेवा. लाटताना त्यावर जास्त दाब न देता हलक्या हाताने लाटा.
advertisement
7/7
पोळी शेकवल्यावर किंवा भाजल्यावर कडक होत असेल तर त्यावर तूप लावून ते लगेच हवाबंद डब्या ठेवा. हे सगळे प्रयत्न करूनही तुमची पोळी फसत असेल तर मग पुरणपोळ्या तुपावर गरम करून त्याचा चुरमास लाडू, मोदक बनवू शकता म्हणजे जिन्नस आणि मेहनत वाया जाणार नाहीच.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Puranpoli : पुरण पातळ झालं, लाटताना पोळी फाटतेय! फसलेली पुरणपोळी परफेक्ट करण्यासाठी सोप्या ट्रिक