TRENDING:

Chandra Grahan 2026: धूलिवंदनच्या संध्याकाळी लागणारं चंद्रग्रहण 3 राशींना त्रासाचे; सूतक काळ लागताच परिणाम दिसेल

Last Updated:
Chandra Grahan 2026: मंगळवारी धूलिवंदन दिवशी 3 मार्च 2026 ला भारतात चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असेल. भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी संपेल. महाराष्ट्रात चंद्रोदयानंतर फार कमी काळच ते आपल्याला पाहता येईल.
advertisement
1/5
धूलिवंदनच्या संध्याकाळी लागणारं चंद्रग्रहण 3 राशींना त्रासाचे; सूतक काळ लागताच..
ग्रहणाचा सूतककाळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासूनच सुरू होणार आहे. ज्योतिषांच्या मते, या चंद्रग्रहणाचा 3 राशींच्या लोकांसाठी मोठा फटका बसू शकतो आणि याचे परिणाम सूतक काळ सुरू होताच दिसू लागतील. कोणत्या राशींनी या काळात जपून राहावं, त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/5
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा कठीण जाऊ शकतो. मनात सतत चिंता आणि टेन्शन राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास थोडा डळमळीत होऊ शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण आणि दबाव वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या साहेबांशी किंवा वरिष्ठांशी खटके उडू शकतात.
advertisement
3/5
सिंह - अचानक खर्च वाढल्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं, त्यामुळे पैशांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचार करूनच घ्या. घरगुती आयुष्य आणि जोडीदारासोबतच्या रिलेशनमध्येही थोडा कडवटपणा येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा किंवा डोळ्यांचे त्रास जाणवू शकतात.
advertisement
4/5
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांच्या बाबतीत अडचणींचा ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळायला उशीर होईल. नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीकडे परिस्थिती थोडी अस्थिर राहू शकते. सोबत काम करणाऱ्यांशी वाद वाढण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात काहीतरी हालचाली करून नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मानसिक दडपण वाढल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तर पोटाचे विकार किंवा ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वेळीच सावध राहा.
advertisement
5/5
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अडचणींचा आणि गोंधळाचा असू शकतो. कामात सारखा उशीर होईल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ लगेच मिळणार नाही. खर्च वाढल्यामुळे आर्थिक ओढाताण जाणवेल. कुटुंबात थोडा तणाव असू शकतो आणि आपल्याच माणसांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात सतत बेचैनी राहील आणि रात्री झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो. प्रवास करताना विशेष काळजी घ्या आणि कुणावरही लगेच डोळे झाकून विश्वास ठेवू नका.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Chandra Grahan 2026: धूलिवंदनच्या संध्याकाळी लागणारं चंद्रग्रहण 3 राशींना त्रासाचे; सूतक काळ लागताच परिणाम दिसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल