TRENDING:

प्रत्येक सीनमध्ये एक नवीन ट्विस्ट! या 7 फिल्म, सीरिज पाहताना डोकं चक्रावून जाईल

Last Updated:
OTT Film Web Series : तुम्हाला भीतीदायक फिल्म पाहायला आवडतात. पण फक्त भीती नाही तर डोकं चक्रावून टाकतील अशा सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल थ्रीलर्स फिल्म हव्यात. तर अशा फिल्म ज्या आता फक्त हत्या, पुराव्यांपर्यंत मर्यादित नाही तर मानवी मेंदूतील जुन्या जखमा आणि भयानक जखमाही ताज्या करतं.  या फिल्म तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असल्या पाहिजेत. 
advertisement
1/7
प्रत्येक सीनमध्ये एक नवीन ट्विस्ट! या 7 फिल्म, सीरिज पाहताना डोकं चक्रावून जाईल
केनेडी : झोपेची समस्या असेलल्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरणारी स्टोरी. जगासाठी तो मृत आहे, पण खरंतर तो भ्रष्ट व्यवस्थेच्या सावटात काम करतो असतो. हा मानसशास्त्रीय थ्रीलर त्याच्या अंधाऱ्या जगात उतरण्याच्या घटनेचं वर्णन करतो. त्याच्या हिंसक कृत्यांद्वारे तो त्याच्या गुन्ह्यांसाठी प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करतो, प्रेक्षकांना शेवटपर्यंत रोखून ठेवतो. तुम्ही ही फिल्म चित्रपट ZEE5 वर पाहू शकता.
advertisement
2/7
सेक्टर 36 : सत्य आणि भयानक घटनांवर आधारित ही फिल्म एक भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि एका क्रूर सीरियल किलरमधील लपाछपीचे चित्रण करतो. चित्रपटाची कथा गुन्ह्याच्या पलीकडे जाते. ती आपल्या समाजातील श्रीमंती आणि गरिबी आणि व्यवस्थेच्या अपयशांमधील अंतर देखील उघड करते. हा चित्रपट मानवांमध्ये दडलेल्या काळ्या सत्यांचा आणि त्यांच्या भयानक मानसिकतेचा खोल आणि त्रासदायक शोध आहे. विक्रांत मेस्सी आणि दीपक डोब्रियाल अभिनीत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
advertisement
3/7
मंडला हत्याकांड: जेव्हा एका प्राचीन गुप्त समाजाशी जोडलेल्या रहस्यमय खुनांची मालिका सुरू होते तेव्हा लोकांना धक्का बसतो. हा वेगवान थ्रीलर चित्रपट तंत्रमंत्राशी संबधित आणि मानसिक ताण यांचं एक अनोखं मिश्रण आहे. तपास जसजसा पुढे जातो तसतसे गुप्तहेरांना खुनी शोधण्यासह स्वत:च्या खोलवर असलेल्या भीतींचाही सामना करावा लागतो. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
advertisement
4/7
मेरी ख्रिसमस : जेव्हा दोन अनोळखी लोक ख्रिसमसला भेटतात तेव्हा त्यांच्या एक स्वीट लव्ह स्टोरी सुरू होईल असं वाटतं पण त्यांची रोमँटिक संध्याकाळ गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकते. जुन्या काळातील आकर्षणाने विणलेला हा मंद गतीचा थ्रीलर तुम्हाला गुंतवून ठेवतो. त्याचे धक्कादायक ट्विस्ट शेवटपर्यंत तुमचा उत्साह जिवंत ठेवतात. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची ही फिल्म नेटफ्लिक्सवर आहे.
advertisement
5/7
मिथ्या-द डार्कर चॅप्टर : ही सीरिज प्राध्यापक आणि त्याच्या विद्यार्थ्यामधील मानसिक युद्धाची कहाणी सांगते. साहित्यिक चोरीच्या आरोपांपासून आणि कुटुंबाच्या सीक्रेटपासून सुरू होणारा हा वाद हळूहळू सूड घेण्याच्या धोकादायक खेळात बदलतो. दोन्ही पात्रं एकमेकांना संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात, ज्यामुळे प्रेक्षकांवर प्रचंड मानसिक ताण येतो. ही सीरिज झी5 वर उपलब्ध आहे.
advertisement
6/7
दलदल : यात  भूमी पेडणेकर डीसीपीच्या भूमिकेत आहे. जी मुंबईच्या रस्त्यांवर एका क्रूर सीरियल किलरचा शोध घेते.  ही कथा केवळ गुन्हेगाराला पकडण्यापुरती नाही तर भूतकाळातील जखमांवर झुंजण्याभोवतीही फिरते. हा थ्रीलर एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विस्कळीत मानसिक स्थितीचा आणि पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्धच्या तिच्या धाडसाचा खोलवर शोध घेतो. ही वेब सीरिज  प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
advertisement
7/7
जाने जाने : ही कथा एका सिंगल मदरची, जी अचानक एका हत्येच्या तपासाच्या फेऱ्यात येते. तिचा एकटा राहणारा शेजारी तिचा गुन्हा लपवण्यास मदत करतो आणि एका गुप्तहेरासोबत मानसिक चेकमेट गेम सुरू होतो. हा चित्रपट संशयास्पद आणि बुद्धिमान पात्रांमधील एक रोमांचक आणि तणावपूर्ण लढाई सादर करतो. या चित्रपटात करीना कपूर आणि जयदीप अहलावत आहे, ही फिल्म तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रत्येक सीनमध्ये एक नवीन ट्विस्ट! या 7 फिल्म, सीरिज पाहताना डोकं चक्रावून जाईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल