आम्ही 20 ते 25 रन्स कमी पडलो
वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप याने मान्य केलंय की वेस्ट इंडिजला हवा होता तेवढा स्कोर उभा करता आला नाही. पीचच्या कंडिशननुसार आम्ही नक्कीच 20 ते 25 रन्स कमी पडलो, असं वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप म्हणाला. विशेषतः शेवटच्या ओव्हर्समध्ये अधिक रन्स व्हायला हवे होते, परंतु बॅटिंगची सुरुवात म्हणावी तशी झाली नाही, असंही तो यावेळी म्हणाला. त्यावेळी त्याने टीम इंडियाच्या एका खेळाडूचा विशेष उल्लेख केला.
advertisement
मॅचचा टर्निंग पॉईंट
विंडीजच्या डावात जसप्रीत बुमराहने 12 व्या ओव्हरमध्ये घेतलेले 2 विकेट्स मॅचचा टर्निंग पॉईंट ठरले, असं शे होप याने म्हटलंय. बुमराहने सेट झालेली हेटमायरची जोडी फोडली, ज्यामुळे विंडीजला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज असते, तेव्हा बुमराह मदतीला धावून येतो. तो त्यांचा मुख्य स्ट्राइक बॉलर असून त्याच्याकडे बॉल असताना काहीही घडू शकतं, असं म्हणत शे होप याने संजूवर नाही तर बुमराहवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
लक्ष्य वर्ल्ड कप जिंकण्याचं होतं
दरम्यान, आम्हाला या टप्प्यावर वर्ल्ड कपमधून निरोप घ्यायचा नव्हता. आणखी एक विजय आम्हाला सेमीफायनलमध्ये घेऊन गेला असता. आम्ही स्वतःसाठी उंच स्टॅन्डर्ड निश्चित केली होती आणि आमचं लक्ष्य वर्ल्ड कप जिंकण्याचं होतं. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी सर्वोत्तम खेळ करावा लागतो आणि आज भारताने आमच्यापेक्षा सरस खेळ केला, असं म्हणत शे होप याने टीम इंडियाचं कौतुक केलं.
आम्ही मर्यादा ओलांडल्या नाही
दरम्यान, आम्ही मुंबई आणि कोलकातामध्ये आमचे बरेच सामने खेळलो. पण आपण विजयी खेळाडूंना श्रेय दिलं पाहिजे, विशेषतः पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट्स घेतल्या. तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल, सातत्यपूर्ण क्रिकेट खेळावे लागेल आणि खेळातील त्या महत्त्वाच्या क्षणांचा फायदा घ्यावा लागेल. आम्ही मर्यादा ओलांडण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि भारत उपांत्य फेरीत पात्र ठरला, असंही शे होप म्हणालाय.
