TRENDING:

Health Tips : तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? वेळीच करा हे उपाय, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:
सध्याच्या घडीला पाहिला गेलं तर अनेकांना केस गळतीची समस्या जाणवत आहे. यामध्ये पहिले तर महिला आणि पुरुष दोघांमध्येही केस गळतीचे प्रमाण आहे.
advertisement
1/5
तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? वेळीच करा हे उपाय, डॉक्टरांनी दिला सल्ला
सध्याच्या घडीला पाहिला गेलं तर अनेकांना केस गळतीची समस्या जाणवत आहे. यामध्ये पहिले तर महिला आणि पुरुष दोघांमध्येही केस गळतीचे प्रमाण आहे. केस गळतीची कारणे नेमकी कोणती? याबद्दलच आपल्याला डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/5
सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, आनुवंशिकतेमुळे पुरुषांमध्ये सर्वाधिक केसगळती होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामध्ये घरातील वडील, काका, मामा, आजोबा यांचे टक्कल पडले असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा ही समस्या होऊ शकते. त्याचबरोबर अनेकांना फॅमिली हिस्ट्री नसताना सुद्धा जेनेटिक म्युटेशनमुळे केस गळतीची समस्या निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
3/5
याच बरोबर महिलांमध्ये पचनाच्या समस्या, हार्मोनल असंतुलन, तणाव या कारणामुळे केस गळतीची समस्या आढळून येते. तसेच केसांत इन्फेक्शन असल्यास महिला आणि पुरुष दोघांमध्येही केस गळती बघायला मिळते. तसेच केसांसाठी हेअर कलर किंवा आणखी काही प्रॉडक्ट वापरत असाल आणि त्यांची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तेव्हा सुद्धा केस गळती होऊ शकते.
advertisement
4/5
केसांच्या समस्या रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. यामध्ये आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश करू शकता. केसांच्या आरोग्यासाठी पोषक असलेल्या सर्वच पदार्थांचा आहारात समावेश करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा शाम्पू केस धुण्यासाठी वापरावा.
advertisement
5/5
तसेच केसांना तेल लावणे टाळावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे देखील टाळावे. केमिकल युक्त हेअर कलर आणि इतरही प्रॉडक्ट वापरणे टाळल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते. आनुवंशिक कारणामुळे होणारी केस गळती ही होणारच. पण योग्य काळजी घेतल्यास त्याचे प्रमाण देखील कमी होण्याची शक्यता असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? वेळीच करा हे उपाय, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल